MP Sahib rules the cricket field before marriage! Priya Saroj bats with Rinku Singh, Video goes viral
Priya Saroj playing cricket in Varanasi : रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज सध्या चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिंकू सिंगशी लवकरच लग्न करणार आहे. साखरपुड्यापासून हे दोघेही चर्चेत आहेत. प्रिया सरोज अलीकडेच एका क्रिकेट स्टेडियममध्ये फलंदाजी करताना दिसून आली आहे. सलवार सूट परिधान केलेल्या खासदार प्रिया सरोजने चेंडूंचा चांगला सामना केला आणि चौकार आणि षटकार देखील मारले. त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना दिसल्या आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
अधिक माहिती अशी की, प्रिया सरोज वाराणसीतील शिवपूर मिनी स्टेडियममध्ये एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी गेली होती. त्या या स्पर्धेत प्रमुख पाहुण्या म्हणून पोहोचल्या असताना या दरम्यान तिने स्वतः बॅट धरून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिने जोरदार फलंदाजी देखील केली.
लोकांना प्रियाची ही शैली खूप भावल्याचे दिसून येत आहे. प्रिया सरोजचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पहिला चेंडू चुकली आणि दुसऱ्या चेंडूवर तिने एक उत्तम फटका मारून स्पर्धेची सुरुवात केली.
सांसद , प्रिया सरोज जी क्रिकेट खेलती हुई 🤗🏏 pic.twitter.com/yYJf9nIk43 — Aadhya Yadav (@Aadhyayadavv) June 18, 2025
प्रिया सरोज मच्छली शहरच्या खासदार आहेत. क्रिकेट जगतापासून राजकारणापर्यंत मोठ्या व्यक्तींनी लखनौमध्ये त्यांच्या साखरपुड्याला उपस्थिती लावली होती. दोघेही एकमेकांना ३ वर्षांपासून ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची ओळख एका मित्राने करून दिली होती. या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.
टी-२० फॉरमॅटमध्ये रिंकूची कामगिरी उतमं राहिली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने एकूण ५०७ धावा काढल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १६० पेक्षा जास्त राहिला असून तो त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीचे प्रतिबिंब आहे. याशिवाय रिंकूने टीम इंडियासाठी २ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत.