Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

एमएस धोनी सध्या आयपीएल २०२६ च्या तयारीत व्यस्त आहे. रांची वाहतूक पोलिसांनी एमएस धोनीला दंड ठोठावला आहे. यापूर्वी, रांचीमधील निवासी भूखंडाचा गैरवापर केल्याबद्दल धोनीला नोटीस बजावण्यात आली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 08:13 PM
मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका (Photo Credit- X)

मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका
  • रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड
  • काय आहे कारणं?
MS Dhoni Fined by Ranchi Traffic Police: आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सराव शिबिरात दाखल झालेल्या महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मोठा धक्का बसला आहे. रांचीमध्ये असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांची ट्रॅफिक पोलिसांनी धोनीवर दंडात्मक कारवाई केली आहे. मैदानावर धावांचा वेग वाढवणाऱ्या धोनीला आता रस्त्यावरील ‘ओव्हरस्पीडिंग’ महागात पडले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन; ई-चलन जारी

मिळालेल्या माहितीनुसार, एमएस धोनीला वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी रांची पोलिसांनी दंड ठोठावला आहे. मोटर वाहन कायद्याच्या कलम १८३ (Section 183) अंतर्गत धोनीच्या नावे ई-चलन (E-Challan) जारी करण्यात आले आहे. धोनीला महागड्या गाड्या आणि बाइक्सची प्रचंड आवड आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेकदा तो रांचीच्या रस्त्यांवर स्वतः गाडी चालवताना दिसतो. मात्र, यावेळी वेगाची मर्यादा ओलांडल्याने त्याला या कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला आहे.

#CrickIt | Former India captain MS Dhoni was charged with overspeeding in Ranchi after his vehicle was caught violating traffic norms, days after he was in Chennai to attend Chennai Super Kings’ preparatory camp for IPL 2026. According to a report in India Today, Dhoni was… pic.twitter.com/7rgOjfu1WS — Hindustan Times (@htTweets) March 4, 2026

काही दिवसांपूर्वीच झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने रांचीमधील एका निवासी भूखंडाच्या कथित गैरवापराबाबत धोनीला नोटीस बजावली होती. त्या वादाची चर्चा संपते ना संपते, तोच आता ट्रॅफिक दंडाच्या कारवाईमुळे धोनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आयपीएल २०२६ ची तयारी जोरात

एकीकडे ही कारवाई सुरू असताना, दुसरीकडे आयपीएल २०२६ चे बिगुल वाजले आहे. यंदाचा हंगाम २८ मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे. ‘थाला’ म्हणजेच एमएस धोनी सध्या चेन्नईमध्ये सीएसकेच्या ट्रेनिंग कॅपमध्ये सराव करत आहे. नेट्समध्ये तो तासनतास फलंदाजीचा सराव करत असून आपल्या आक्रमक शैलीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, सीएसकेने यंदा धोनीला ‘अनकॅप्ड’ खेळाडूच्या नियमांतर्गत ४ कोटी रुपयांत रिटेन केले आहे.

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली सहाव्या जेतेपदाचे लक्ष्य

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला ५ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र, यंदा संघ ऋतुराज गायकवाड़च्या नेतृत्वाखाली आपले सहावे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामात सीएसकेने संघात मोठे बदल केले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून रवींद्र जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसनला ट्रेड करण्यात आले असून तो यंदा पिवळ्या जर्सीत दिसेल. सरफराज खानसारख्या युवा आणि तगड्या खेळाडूचाही संघात समावेश करण्यात आला आहे. एमएस धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो, अशी चर्चा असल्याने जगभरातील क्रिकेट चाहते आपल्या पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Ms dhoni fined by ranchi traffic police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
4

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.