
Spartan Monsoon League
पहिल्या लढतीत गेम स्विंगर्स पुणे संघाने फार्मा इलेव्हन संघाचा ६५ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना गेम स्विंगर्सने प्रशांत भुरूकपाटीलच्या तडाखेबंद नाबाद १२६ धावा आणि ओजस साठेच्या उपयुक्त ६६ धावांच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांसमोर २३३ धावांचे तगडे आव्हान उभे केले. या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फार्मा इलेव्हनचा संपूर्ण डाव अवघ्या १६८ धावांवर गारद झाला.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
दुसऱ्या सामन्यात टोरनेडोज् क्लबने चौफेर फटकेबाजी करत रियुनायटेड क्लबचा २०७ धावांच्या मोठ्या फरकाने दारुण पराभव केला. टोरनेडोज् क्लबच्या फलंदाजांनी २० षटकांत ३५८ धावांचा महाप्रचंड डोंगर उभा केला. यात अमित दास (१०२ धावा) आणि गणेश होले (१०६ धावा) यांनी झळकावलेली शतके निर्णायक ठरली. मोठ्या आव्हानासमोर रियुनायटेड क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या १५१ धावांवर आटोपला.
junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
तिसऱ्या सामन्यात सौरभ देवोरेच्या चमकदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्लेजहॅमर स्ट्रायकर्स संघाने आरटी ग्रुप संघावर ३ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरटी ग्रुपचा डाव १५१ धावांवर मर्यादित राहिला. स्लेजहॅमर स्ट्रायकर्सच्या उमेश देवधरने ३ गडी बाद केले, तर सौरभ देवोरे, वरूण श्रीखंडे आणि अलोक नागराज यांनी प्रत्येकी २ गडी टिपून सुरेख साथ दिली. विजयासाठी आवश्यक १५२ धावांचे लक्ष्य स्लेजहॅमर स्ट्रायकर्सने १७.५ षटकांत ७ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून नचिकेत परचुरे (५१ धावा), नचिकेत कुलकर्णी (३५ धावा) आणि सौरभ देवोरे (२२ धावा) यांनी जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा विजय खेचून आणला.