MS Dhoni Retirement: 'I have to take a decision on retirement..': Mahendra Singh Dhoni's big hint about retirement from IPL
MS Dhoni : काल (5 एप्रिल) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीकडून चेन्नईला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लगाला. चेन्नईने गेल्या दोन सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील हारकिरी केलेली दिसून आली आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या संथगती खेळाचा देखील फटका चेन्नईला सोसावा लगाला. धोनी पाहिल्यासारखा खेळताना दिसत नसल्याने त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
एमएस धोनी हा क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक गणला जातो. त्याचा प्रभाव अजून देखील आयपीएलमध्ये कायम असल्याचे दिसून येत आहे. अशातच एमएस धोनीने स्वतःचे ॲप लाँच केले आहे. त्याद्वारे लोकांना त्याच्या जीवनाबद्दल माहिती मिळणार आहे. तसेच धोनीने पहिल्यांदा एक मुलाखत देखील दिली आहे. जी आता धोनी ॲपवर उपलब्ध झाली आहे. धोनीने कंटेंट क्रिएटर राज शामानी यांनी घेतलेल्या मुलाखतीत निवृत्तीबद्दल काही संकेत दिले आहेत.
हेही वाचा : CSK vs DC : ‘तो जिंकण्याचा विचार करत नाही..’ : धोनीच्या फलंदाजीवर नवज्योतसिंग सिद्धू बरसला!
धोनीने मुलाखती दरम्यान त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली. धोनी म्हणाला की, ‘बघा, आत्ता नाही, मी एका वेळी केवळ एकच काम करतो, सध्या आयपीएल आहे. मी सर्वकाही अगदी साधे सोपे ठेवतो, मी फारसा विचार करत नाही, वर्षानुवर्षे मी पुढे जात असतो. भविष्याचा विचार करू नका. मी आता 43 वर्षांचा आहे, जुलैमध्ये मी 44 वर्षांचा होईल, त्यांतर 10 महीने वेळ आहे.’
धोनी पुढे म्हणाला की, ‘मी आणखी एक वर्ष खेळावे की नाही? मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागेल असे नाही. तुमचे शरीर सांगत असते, की तुम्ही पुढे खेळू शकता अथवा नाही. बघूया पुढे काय होते. अजून 8 ते 10 महिन्यांचा वेळ आहे.’
हेही वाचा : PBKS vs RR : Sanju Samson कडून शेन वॉर्नचा विक्रम खालसा! राजस्थान रॉयल्ससाठी केली मोठी कामगिरी…
काल (5 एप्रिल) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईचा आयपीएल 2025 मधील सलग तिसरा पराभव ठरला आहे. या सामन्यात दिल्लीकडून चेन्नईला 25 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने गेल्या दोन सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील खराब कामगिरी कायम ठेवली आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमावून 183 धावा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात चेन्नई सुपर किंग्स संघ 5 गडी गमावत 158 धावाच करू शकला.