Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Inside Story: मुंबई इंडियन्सचा विभीषण नक्की कोण? ड्रेसिंग रूमच्या बाहेर सर्व बातम्या Leak, मॅनेजमेंटमध्ये पसरली भीती

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. इतकेच नाही, तर आता ड्रेसिंग रूममधील अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत, अधिकारी चिंतेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 30, 2026 | 11:39 AM
मुंबई इंडियन्सच्या उतरत्या काळाला जबाबदार कोण? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मुंबई इंडियन्सच्या उतरत्या काळाला जबाबदार कोण? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सचे अधिकारी चिंतेत
  • ड्रेसिंग रुममधील माहिती चव्हाट्यावर 
  • नक्की कोण ठरतंय त्रासदायक 
पाच वेळा विजेत्या असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी २०२६ ची इंडियन प्रीमियर लीग एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ प्लेऑफमध्येदेखील पोहोचू शकला नाही. इतकेच नाही, तर गतविजेत्या संघाला संपूर्ण हंगामात ड्रेसिंग रूममधील अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला. ड्रेसिंग रूममधील मतभेद ही काही नवीन गोष्ट नाही, पण रोहित शर्माकडून कर्णधारपद स्वीकारल्यापासून हार्दिक पांड्याच्या काळामध्ये हे कलह अधिकच वाढले आहेत.

याच कारणामुळे, ड्रेसिंग रूममधील माहिती सतत बाहेर फुटत असल्यामुळे फ्रँचायझीमधील प्रमुख अधिकारी अत्यंत निराश आहेत. गेल्या काही हंगामांमध्ये ज्या प्रकारे घटना घडल्या आहेत आणि ड्रेसिंग रूमच्या गोपनीयतेशी सातत्याने तडजोड केली गेली आहे, त्यामुळे क्रिकेट जगतातील जाणकारही चकित झाले आहेत, जे संघासाठी निश्चितच चांगले नाही.

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ

काय म्हणाले अधिकारी?

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “जवळजवळ प्रत्येक ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असतात, पण हार्दिक पांड्या परतल्यापासून मुंबई इंडियन्समध्ये गटबाजी आणि कटुता असामान्यपणे वाढली आहे. काय चालले आहे हे समजण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही, पण मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी, जिने नेहमीच आपल्या मुख्य खेळाडूंना प्राधान्य दिले आहे, ही सतत ड्रेसिंग रुममधील माहिती फुटणं ही एक मोठी चिंतेची बाब आहे. हा शब्द बोलायला कठोर आहे, पण हेच वास्तव आहे. त्या ड्रेसिंग रूमने दिग्गज खेळाडू, कर्णधारपदातील बदल आणि बरेच काही पाहिले आहे, पण असे काहीही कधीही घडले नाही, जे यावर्षी घडले आहे”

व्यवस्थापन नाराज 

सूत्राने पुढे सांगितले, “व्यवस्थापनाला हे अजिबात आवडलेले नाही. काही खेळाडूंनी सोशल मीडियावर इमोजी पोस्ट केल्यानंतर बराच गदारोळ झाला होता आणि तेव्हापासून हा गदारोळ थांबलेला नाही. मग ती ड्रेसिंग रूममधील उघड गटबाजी असो, मैदानावर खेळाडूंची देहबोली असो किंवा त्यांची खेळण्याची शैली असो. समस्या आहेत आणि त्या जगासमोर स्पष्ट आहेत. जर खेळाडूंना वाटत असेल की ते मुंबई इंडियन्सला हलक्यात घेऊ शकतात, तर त्यांनी पुनर्विचार करण्याची गरज आहे. प्राधान्यक्रम स्पष्टपणे चुकले आहेत. खेळाडूंना मैदानावर परतायला खूप वेळ लागत आहे आणि असे वाटते की प्रत्येकजण फक्त हजेरी लावण्यासाठीच येत आहे. कोणीही चांगला खेळ केला नाही”

दरम्यान यावर्षीदेखील हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मैदानात खेळण्यापेक्षा त्याच्या खासगी आयुष्याबाबतच जास्त चर्चा झाली आणि याचाच परिणाम मुंबई इंडियन्सच्या संघावरही झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. इतंकच नाही तर किरॉन पोलार्डने स्पष्टपणे हार्दिकला भरपूर संधी देण्यात आल्याचे विधानही केले होते. दरम्यान ऋषभ पंतने LSG चा राजीनामा दिला त्याप्रमाणे हार्दिकदेखील मुंबई इंडियन्स संघ सोडणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ

Web Title: Mumbai indians dressing room information leaked ipl 2026 management officials are tensed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
1

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
2

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट
3

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.