फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Match report between Kolkata Knight Riders vs Mumbai Indians : कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामन्याचा आयोजन करण्यात आले होते. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात मुंबईने वानखेडे स्टेडियमवरत्यांचा पहिला विजय खात्यात जमा केला आहे. मुंबईच्या संघाने केकेआर 8 विकेट्सने पराभूत केले.
कोलकत्ता नाईट रायडर्सच्या खराब कामगिरीमुळे विशेषतः फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२५ चा पहिला विजय वानखेडेवर नावावर केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनी जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि याचा फायदा त्याला नक्कीच झाला.
केकेआर विरुद्ध एमआय यांच्यामधील सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स यांच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्या पाच चेंडूंमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाजांना पहिल्या पाच चेंडूंमध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे होमग्राउंड असूनही तो ७ चेंडू खेळून ११ धावा करत बाद झाला.
क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन दोघेही स्वस्तात बाद झाले. अंगकृष रघुवंशीने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. वेंकटेश अय्यरने संघासाठी फक्त ३ धावा करून बाद झाला. रिंकू सिंहने १४ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या आणि त्याला अशवाणी कुमारने भारताचा रस्ता दाखवला. मनीष पांडेने १४ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या तर आंद्रे रसेलने ११ चेंडूमध्ये पाच धावा केल्या. रमनदीप सिंग सुद्धा मोठी कामगिरी संघासाठी करू शकला नाही त्यांनी १२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. हर्षित राहणारे ३ चेंडूंमध्ये १ धाव करून बाद झाला आणि संघाचा खेळ संपला.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघासाठी सर्वाधिक विकेट्स अश्ववाणी कुमार यांनी तीन ओव्हर मध्ये २४ धावा देत चार विकेट्स नावावर केले तर दीपक चाहरने संघासाठी दोन ओव्हर मध्ये दोन विकेट्स घेतले. कॅप्टन हार्दिक पांड्या, विघ्नेश पुथुर, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सॅन्टनर या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.