आयपीएल २०२३-मुंबई इंडियन्स : इंडियन प्रीमियर लीग २०२३ मधील सर्वात मोठी पाहायला मिळाली आणि मुंबई इंडियन्स करारावर अखेर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झालं आहे. पाच वर्ष मुंबई इंडियन्समध्ये खेळून झाल्यानंतर गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून देणार कर्णधार हार्दिक पांड्याचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाले आहे. २६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात बराच संभ्रम निर्माण झाला होता. आधी हार्दिकला गुजरातनं आपल्याकडेच ठेवल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र, आता हार्दिक मुंबईकडे परतणार असल्याच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालं आहे. रविवारी हार्दिक पांड्या हा पुनरागमन करत आहे असे शिक्कामोर्तब झाले आहे.
१९ डिसेंबर रोजी लिलाव पार पडणार आहे. त्यांनतर १२ डिसेंबर रोजी संघाना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा देण्यात येणार आहे. आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे परतणार असल्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. परंतु मुंबई इंडियन्स कडे कोणत्या नव्या युक्त्या आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व संभाळणार का? या चर्चेने सध्या सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे हार्दिक मुंबईचे कर्णधारपद संभाळणार का? ही चर्चा रंगली आहे. याचे उत्तर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने अप्रत्यक्षरित्या दिले आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने शानदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने पदार्पणात चषक जिंकला, तर दुसऱ्या हंगामात उप विजेतेपद पटकाले होते. आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर वक्तव्य केलेय. आकाश चोप्रा म्हणाला की, “हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वात पदार्पणाताच चषक उंचावला होता. दुसऱ्या हंगामात रनरअप राहिला होता. हार्दिक पांड्या कॅश डीलमध्ये (पैशांच्या व्यवहारात) मुंबईच्या ताफ्यात परतलाय, हे थोडं चकीत करणारे आहे. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार होणार आहे ? मग रोहित शर्माचं काय होणार?” मुंबई इंडियन्स कोणते नवे निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.