Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरमनप्रीत कौरच्या टोळीने दुसऱ्यांदा WPL 2025 चे टायटल केले नावावर, दिल्ली कॅपिटल्सचा तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियाने ८ धावांनी पराभव करून जेतेपद नावावर केले आहे. मुंबईने दुसऱ्यांदा टायटल नावावर केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 16, 2025 | 11:30 AM
फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Indians win WPL 2025 title for the second time : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सिझन संपला आहे. काल या सीझनचा शेवटचा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये भिडत पाहायला मिळाली. महिला प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना शनिवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियाने ८ धावांनी पराभव करून जेतेपद नावावर केले आहे. यासह मुंबई इंडियन्सच्या संघाने महिला प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद जिंकून दुसऱ्यांदा टायटल नावावर केले आहे.

Virat Kohali : ‘कदाचित पुन्हा खेळताना दिसणार नाही..’; आयपीएलपूर्वीच विराट कोहलीचे चाहत्यांना अस्वस्थ करणारे विधान…

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा अहवाल

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ७ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १४१ धावा करू शकला. दिल्लीने सलग तिसऱ्यांदा WPL फायनल गमावली आहे.

१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मेग लॅनिंग फक्त १३ धावा करून बाद झाली. त्याच्या बाद झाल्यानंतर, शेफाली देखील ४ धावा करून बाद झाली. यानंतर, जेस जोनासेन काही खास करू शकली नाही आणि फक्त १३ धावा करून बाद झाली. तिच्या बाद झाल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जने डावाची जबाबदारी घेतली, पण ती देखील ३० धावांवर बाद झाली. एकेकाळी दिल्ली संघाने फक्त ६६ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. तिच्या बाद झाल्यानंतर, मॅरिझॅन कॅपने २५ चेंडूत ४० धावा केल्या. पण त्याच्या बाद झाल्यानंतर दिल्लीच्या आशा धुळीस मिळाल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला.

#TATAWPL 2025, you have been incredible 🙌 📸📸 We leave you with the 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 of this edition- 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐬 🏆#DCvMI | #Final | @mipaltan pic.twitter.com/yyyfVVAog3 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025

कॅप्टन हरमनचे दमदार अर्धशतक

कर्णधार हरमनप्रीत कौर (६६ धावा) हिच्या अर्धशतकानंतरही, महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केवळ १४९ धावाच करू शकले. मुंबई इंडियन्सकडून हरमनप्रीतने ४४ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६६ धावा केल्या, तर नॅट सायव्हर ब्रंटने ३० धावांचे योगदान दिले.

Hurricane Harman steps up on the big stage 🔥 For her swashbuckling knock of 66(44) under pressure, #MI captain Harmanpreet Kaur is named the Player of the Match👏 Scorecard ▶ https://t.co/2dFmlnw05L #TATAWPL | #DCvMI | #Final | @ImHarmanpreet pic.twitter.com/0R5zOhGSCg — Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाज मॅरिझाने कॅपने मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांच्याशिवाय जेस जोनासेन आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अ‍ॅनाबेल सदरलँडला एक यश मिळाले.

 

Web Title: Mumbai indians win wpl 2025 title for the second time lose to delhi capitals in final for the third time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • Mumbai Indians vs Delhi Capitals
  • WPL 2025

संबंधित बातम्या

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री
1

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर
2

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!
3

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…
4

Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.