Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख

Disha Salian case: यापूर्वी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच गरज भासल्यास नवीन एफआयआर (FIR) दाखल करून पुढील तपास केला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 28, 2026 | 03:46 PM
Disha Salian, Mumbai High Court, Aaditya Thackeray

Disha Salian, Mumbai High Court, Aaditya Thackeray

Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून.
  • दिशा यांच्या वडिलांची लैंगिक अत्याचार व हत्येचा गुन्हा दाखल करून नव्या तपासाची मागणी.
  • यापूर्वीच्या सुनावणीत मुंबई पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाने उपस्थित केले होते गंभीर प्रश्न.
Disha Saliyan High Court: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाला पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यूची नव्याने चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिशा सालियन यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी दिशा यांच्या वडिलांनी याचिकेत केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आवश्यक असल्यास एफआयआर दाखल करून पुढील तपास करता येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले होते.

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

“एका वडिलांनी आपली मुलगी गमावल्याने या प्रकरणाकडे आम्ही अत्यंत संवेदनशील दृष्टीने पाहत आहोत, राजकारण्यांवरील आरोपांपेक्षा एका वडिलांनी गमावलेल्या मुलीच्या मृत्यूचा तपास झालाच पाहिजे, अशी भूमिकाही न्यायालयाने व्यक्त केली होती.

आदित्य ठाकरेंच्या वकिलांचा राजकीय हेतूचा आरोप

दुसरीकडे आज झालेल्या सुनावणीत आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असून, राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून हे प्रकरण उभे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यात माजी मंत्री नारायण राणे यांचे कुटुबीय आणि राष्ट्रीय माध्यातील एक वृत्त निवेदक (अर्णब गोस्वामी) या उल्लेख करण्यात आला होता. राजकीय वैरातून हे तथ्यहीन आरोप करण्यात आले असल्याने ही याचिका टिकण्यायोग्य नसल्याचे पासबोला यांनी म्हटले.

तर , दिशा सालियन यांच्या वडिलांबद्दल आपल्याला पूर्ण सहानुभूती असून, त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत समाधानकारक निष्कर्ष मिळायला हवा, अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मांडली. पण या याचिकेतील मागण्या कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. “दिशाच्या वडिलांबद्दल आमची पूर्ण संवेदना आहे; मात्र त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण थांबायला हवे,” अशी बाजू आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मांडली.

Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत

सरकारी वकिलांकडून याचिका फेटाळण्याची मागणी

दुसरीकडे, सरकारी वकील शिशिर हिरे यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली. दिशा सालियन यांच्या मृत्यूमध्ये गुन्हा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून सिद्ध होत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, दिशा सालियन यांच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले नसल्याचा दावाही सरकारी वकिलांनी केला. दिशा यांच्या मृत्यूबाबत विविध आरोप-प्रत्यारोप होत असल्याने तपास सुरू ठेवण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, दिशा सालियन ज्या व्यक्तीसोबत राहत होत्या, त्या रोहित रॉय यांचा जबाब नोंदवणयात आला होता. रोहित रॉय यांच्या जबाबानुसार, दिशा सालियन नैराश्यात होत्या आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

तसेच, पोलिसांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन प्रकरणासंदर्भात कोणाकडे काही माहिती किंवा तक्रार असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही कोणीही अशा प्रकारची तक्रार घेऊन पुढे आले नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.

आता न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

दिशा सालियन यांच्या वडिलांनी केलेल्या मागण्यांवर, मुंबई पोलिसांच्या तपासावर आणि नव्याने एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवल्याने आता दिशा सालियन प्रकरणात नव्याने तपासाचे आदेश दिले जातात का, की याचिका फेटाळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Mumbai newsdisha salian death case mumbai high court reserves verdict on re investigation petition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
1

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.