Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

मुंबईतील मोकळी मैदानं आणि खेळाची मैदाने वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन सुरू केले आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाच्या आरक्षणावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत जेन-झीच्या मैदानांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 09:18 PM
मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

Follow Us
Follow Us:
  • नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी तिरंगा आंदोलन.
  • गेल्या चार वर्षांत मुंबईतील 17 पेक्षा अधिक मैदानांचे आरक्षण बदलल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप.
  • ‘जेन-झीने स्क्रीनऐवजी मैदानावर असावे, मग मैदानं ठेवताय कुठे?’ असा प्रश्न.
 

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदानं आणि खेळाच्या जागा वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाची सुरुवात केली आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलू नये, या मागणीसाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईतील मैदानांच्या प्रश्नावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेन-झीतील तरुणांनी स्क्रीनऐवजी मैदानावर अधिक वेळ घालवावा, असे म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला. ‘तरुणांनी मैदानावर असावे म्हणता, पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“मुंबईतील 17 पेक्षा अधिक मैदानांचे आरक्षण बदलले”

मुंबईतील मोकळी मैदानं, रिक्रिएशन ग्राऊंड आणि प्ले ग्राऊंड यांचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. गेल्या चार वर्षांत मुंबईतील 17 पेक्षा अधिक मैदानांचे आरक्षण निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचा उल्लेख करताना या जागेचे क्षेत्रफळ सुमारे 2.58 हेक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. हे मैदान खेळासाठीच कायम राहावे आणि त्यावर काँक्रिटीकरण होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

‘आम्ही आमच्या मैदानासाठी का पैसे मोजायचे?’

आदित्य ठाकरे यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचाही मुद्दा उपस्थित केला. मैदानांच्या वापरासंदर्भात काही संस्थांना आणि खासगी घटकांना मिळणाऱ्या सुविधांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी, ‘आम्ही आमच्या मैदानासाठी का पैसे मोजायचे?’ असा सवाल केला.

I hope to see you join us today To save Mumbai’s open spaces being gifted to the BJP’s friends by the regime First protest: Today
5 pm
Neville D’Souza Football Turf
Bandra West pic.twitter.com/hhBiHE0kFO
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 23, 2026

मुंबईतील विविध मोकळ्या जागांवर बांधकामाचा दबाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी मैदान वाचवण्याची लढाई मोठ्या प्रमाणात उभी करण्याचे संकेत दिले. मुंबईतील नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

दरम्यान, आंदोलकांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रेड कार्ड दाखवले. मुंबईची मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी पुढील काळातही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले.

Web Title: Aaditya thackeray mumbai playgrounds save ground neville dsouza maidan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BMC
  • devendra fadnavis
  • Mumbai News
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
1

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
2

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
3

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू
4

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.