Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम

Naushad Khan Viral Video: मुंबईचा युवा क्रिकेटपटू मुशीर खान याने रणजी ट्रॉफीत ऐतिहासिक कामगिरी करत ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुशीरने शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर गोलंदाजीत ६ विकेट्स घेतल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 01:03 PM
Naushad Khan Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Naushad Khan Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुशीर खानने रणजी ट्रॉफीत ३५ वर्षांचा विक्रम मोडला.
  • हरियाणाविरुद्ध शतकासह ६ विकेट्सची कामगिरी.
  • वडील नौशाद खान यांचा ट्रेनिंग व्हिडीओ व्हायरल.

मुंबई क्रिकेटमध्ये नौशाद खान हे नाव माहित नाही असा माणूसच नाही. लोक त्यांना सरफराज खान आणि मुशीर खान या दोन पोरांचा बाप आणि कोच म्हणून ओळखतात.नौशाद खानचं स्वतःचं टीम इंडियात खेळायचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते स्वप्न आपल्या मोठ्या पोरामध्ये, सरफराजमध्ये बघितलं आणि सरफराजने ते खरं करून दाखवलं. आता त्यांचा धाकटा पोरगा मुशीर खान पण त्याच वाटेवर आहे. त्याने नुकतंच मुंबईसाठी खेळताना 35 वर्ष जुना रेकॉर्ड तोडलाय. याच दरम्यान नौशाद खानचा एक ट्रेनिंगचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. Naushad Khan Viral Video:

मिडियम पेसरला कसं खेळायचं?

बापाकडून धडासोशल मीडियावर जो व्हिडीओ फिरतोय त्यात नौशाद खान आपल्या लेकाला, मुशीरला बॅटिंग शिकवताना दिसताहेत. ते म्हणताहेत, “जेव्हा तू मिडियम पेसरला खेळतो, तो साईड आर्म बॉलर असतो… साईड आर्मने जेव्हा बॉल येतो, तेव्हा तू खूप आधी पोझिशन घेतली पाहिजे. त्यामुळे तुला एक्स्ट्रा टाइम मिळतो. इथे तुला फ्रंटफूटवर जाता येणार नाही. मिडियम पेसरला फक्त मनगट फिरवायचं असतं.”ऐकायला सोपं वाटतं, पण यामागे किती वर्षांची मेहनत आहे ते त्या व्हिडीओत दिसतं. एक बाप आपल्या पोराला एक एक बारीक गोष्ट समजावून सांगतोय.

रवी शास्त्रींचा रेकॉर्ड मोडला, मुशीरने इतिहास घडवला

मुशीरने नुकतंच रणजी ट्रॉफीत जे केलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने आधी सेंच्युरी मारली आणि नंतर बॉलिंग करताना 6 विकेट पण घेतल्या.असं करणारा तो मुंबईचा सहावा खेळाडू ठरलाय. एकाच रणजी मॅचमध्ये शंभर रन आणि 5 पेक्षा जास्त विकेट घेणं सोपं नाही. याच्या आधी हे काम खुद्द रवी शास्त्री यांनी 1990 साली केलं होतं. म्हणजे 35 वर्षांनंतर मुशीरने तोच रेकॉर्ड मोडला आहे. आता तर तो थेट टीम इंडियाचे दरवाजे ठोठावतोय.

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

आझाद मैदानावर घडले दोन हिरे

नौशाद खानने आपल्या दोन्ही पोरांना मुंबईच्या आझाद मैदानावर घडवलं आहे. तिथे ऊन असो, पाऊस असो, त्यांनी रोज कडक शिस्तीत प्रॅक्टिस करून घेतली. खायला प्यायला काही नसायचं, खूप खडतर दिवस काढले. पण बापाने हार मानली नाही.सरफराजला जेव्हा पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप मिळाली, तेव्हा मैदानावर उभे असलेले नौशाद खान रडले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण ते अश्रू फक्त आनंदाचे नव्हते, तर वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे होते.

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

आज सरफराज टीम इंडियात आहे, मुशीर रणजी गाजवतोय. पण या दोघांच्या मागे उभा असलेला खरा माणूस म्हणजे नौशाद खान. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पोरांना घेऊन जाणारा, दिवसभर त्यांना थ्रो देणारा तो बाप आज खऱ्या अर्थाने जिंकलाय.

Web Title: Musheer khan breaks 35 year old ranji record naushad khan training video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • cricket news
  • Marathi News
  • Sport News

संबंधित बातम्या

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा
1

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?
2

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
3

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
4

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.