Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा

Virat Kohli Struggles: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या वनडे मालिकेआधी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. पहिल्या नेट सेशनमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर सर्वांचे लक्ष होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 12:46 PM
Virat Kohli Struggles: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Virat Kohli Struggles: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीला आकिब नबीने नेट्समध्ये वारंवार बीट केलं.
  • गुरनूर बरार आणि अंशुल कंबोजचीही भेदक गोलंदाजी.
  • न्यूझीलंड वनडे मालिकेआधी टीम इंडियाचा सराव सुरू.

भारतीय वनडे टीम सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच मॅचच्या वनडे सीरिजसाठी तयारीला लागली आहे. रविवारी टीम इंडियाचं पहिलं प्रॅक्टिस सेशन झालं आणि सगळ्यांचं लक्ष दोनच माणसांवर होतं, विराट कोहली आणि रोहित शर्मा.Virat Kohli Struggles:

दोघेही अनुभवी खेळाडू आहेत, पण नेट्समध्ये त्यांना चांगलाच घाम फोडावा लागला. कारण समोर होते आपलेच तरुण फास्ट बॉलर. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या आणि तिथल्या परिस्थितीचा विचार करून ही प्रॅक्टिस ठेवली होती, आणि आपल्या तरुण गोलंदाजांनी तर कमालच केली.

तीन तरुण बॉलर, ज्यांनी सगळ्यांचं लक्ष घेतलं

नेट सेशनमध्ये आकिब नबी, अंशुल कंबोज आणि गुरनूर बरार या तीन तरुण वेगवान गोलंदाजांनी घातक बॉलिंग केली. गुरनूर बरार उंचापुरा आहे, त्याने त्याच्या उंचीचा पूर्ण फायदा घेतला. त्याने बॉलला जास्त उसळी दिली, त्यामुळे बॅट्समनला शॉर्ट बॉल खेळायला खूप अवघड जात होतं. बॉल अंगावर येत होता.

अंशुल कंबोजने एकदम अचूक लाईन आणि लेंथवर बॉल टाकला. एकही खराब बॉल नाही. पण सगळ्यात जास्त भाव खाऊन गेला तो आकिब नबी. खास करून जेव्हा तो विराट कोहलीला बॉलिंग करत होता, तेव्हा सगळे बघतच राहिले.या प्रॅक्टिसला वनडे कॅप्टन शुभमन गिल नव्हता. त्यामुळे सगळ्या कॅमेरांचे फोकस विराट आणि रोहितवरच होते. हे सिनियर बॅट्समन न्यूझीलंडच्या वातावरणात कसे खेळतात हे बघण्यासाठीच हे नेट सेशन ठेवलं होतं, पण शेवटी चर्चा झाली ती या तीन तरुण बॉलरचीच.

Virat Kohli And Rohit Sharma Bating Practice Show at Auckland.🔥 https://t.co/Do8ZuYOjFY — Sahil (@SahilSinghadiya) November 1, 2026

विराटसाठी डोकेदुखी ठरला आकिब नबी

आकिब नबी हा नुकताच लिंकनमध्ये इंडिया ए साठी अनऑफिशियल टेस्ट खेळून आलाय, तिथे त्याने भारी कामगिरी केली होती. आता प्रसिद्ध कृष्णा जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी आकिबला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे टीममध्ये घेतलं आहे. त्याने संधीचं सोनं केलं. रिपोर्टनुसार, आकिबने सारखं सारखं बॅटच्या बाहेरील कडेला बॉल घासून नेला. त्याची स्विंग इतकी भारी होती की अनुभवी बॅट्समन पण फसले. विराट कोहलीला तर त्याने खूप त्रास दिला.

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

कधी कधी विराटने एकदम भारी टायमिंगने फटके मारले, पण बऱ्याच वेळा आकिबने त्याला बीट केलं. त्याने आत येणारे बॉल टाकून विराटच्या पॅडवर आणि थाय पॅडवर मारले. बाहेर जाणाऱ्या बॉलने तर विराटला सारखं फसवलं. एकावेळी तर विराट थोडा वैतागलेलाही दिसला.

पण विराट तो विराटच. त्याचा स्वभावच तसा आहे. थोड्या वेळाने त्याने तो कठीण काळ मागे टाकला आणि पुन्हा जोशात आला. प्रॅक्टिसनंतर तो मैदानाच्या कडेला रोहितसोबत गप्पा मारत, हसत खेळत मस्ती करताना दिसला.

 

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

रोहितने सावध खेळ केला

बाकीच्या बॅट्समनसाठी पण हे सेशन सोपं नव्हतं. रोहित शर्माने मात्र घाई केली नाही. त्याने एकदम संभाळून खेळण्याचा प्लॅन केला. पिचचा वेग समजून घेत त्याने आधी डिफेन्स पक्का केला आणि मध्ये मध्ये चांगले फटके पण मारले. नंतर केएल राहुल पण थोडा वेळ प्रॅक्टिससाठी आला होता. ऋतुराज गायकवाडने पण या फास्ट बॉलरचा सामना करत वेळ घालवला.एकंदरीत बघता, न्यूझीलंडला जायच्या आधीच आपल्या तरुण बॉलरनी सिनियर लोकांना चांगलीच प्रॅक्टिस दिली आहे. आकिब नबी नावाचा हा पोरगा जर असाच खेळत राहिला, तर न्यूझीलंडमध्ये तो मोठा गेम चेंजर ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी भारताचा सराव कधी सुरू झाला?

    Ans: रविवारी भारतीय संघाचे पहिले नेट प्रॅक्टिस सेशन पार पडले.

  • Que: नेट प्रॅक्टिसमध्ये विराट कोहलीला कोणत्या गोलंदाजाने अडचणीत आणले?

    Ans: युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीने विराट कोहलीला वारंवार बीट केले.

  • Que: सराव सत्रात कोणत्या तीन युवा गोलंदाजांनी छाप पाडली?

    Ans: आकिब नबी, अंशुल कंबोज आणि गुरनूर बरार यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

Web Title: Virat kohli struggles against aqib nabi india new zealand odi series practice rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?
1

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
2

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
3

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड

Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
4

Oregon News :विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.