टीम सौदी, केन विल्यमसन,ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंड हे खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा : जगभरामध्ये T20 विश्वचषक 2024 ची चर्चा सुरु आहे. या विश्वचषकामध्ये २० संघ सामील झाले होते आणि अनेक नवीन संघानी उत्कृष्ट खेळी खेळून सुपर-८ मध्ये एंट्री केली आहे. T20 विश्वचषक 2024 हा न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचे झाले तर संघाने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ सुपर-८ मध्ये सुद्धा प्रवेश करू शकला नाही. न्यूझीलंडला विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानने पराभूत केलं तर दुसऱ्या सामन्यांमध्ये त्यानं वेस्ट इंडिजने मात दिली. या दोन पराभवांमुळे त्यांना सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
T20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडचा संघ केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळात होता. परंतु त्यांना सुपर-८ चा टप्पा गाठता आला नाही. संघ विश्वचषकाच्या बाहेर पडल्यानंतर संघाचा मुख्य गोलंदाज ट्रेंट बोल्टने पुष्टी केली की हा त्याचा शेवटचा T -20 विश्वचषक होता. आता आणखी दुःखद बातमी समोर आली आहे की, ट्रेंट बोल्टसह न्यूझीलंडच्या आणखी दोन खेळाडूंसाठी हा शेवटचा टी-२० विश्वचषक असू शकतो. यामध्ये पहिले नाव न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि दुसरे नाव टीम सौदी आहे.
कर्णधार केन विल्यमसनची कामगिरी
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा एक विस्फोटक स्फोटक फलंदाज म्हणू ओळखला जातो. परंतु काही काळापासून त्याची बॅट शांतच राहिली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचाही हा शेवटचा टी-२० विश्वचषक असू शकतो. 2024 च्या विश्वचषकात विल्यमसन पूर्णपणे फ्लॉप दिसला. त्याने स्पर्धेच्या दोन डावात फलंदाजी करत अनुक्रमे 09 आणि 01 धावा केल्या. त्याने आतापर्यंत 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, 89 डावात फलंदाजी करत 33.20 च्या सरासरीने आणि 123.22 च्या स्ट्राइक रेटने 2557 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 18 अर्धशतके आली आहेत.
ट्रेंट बोल्टची आंतरराष्ट्रीय कामगिरी
ट्रेंट बोल्टने या एक विस्फोटक गोलंदाज होता. त्याने पत्रकार परिषदेमध्ये पुष्टी केली की हा त्याचा शेवटचा T-२० विश्वचषक असणार आहे. त्याच्या विश्वचषकाच्या कामगिरी बद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यात त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याने 60 T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 60 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 21.79 च्या सरासरीने 81 बळी घेतले आहेत.
वेगवान गोलंदाज टीम सौदी कामगिरी
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदीसाठी 2024 चा टी-20 विश्वचषक शेवटचा ठरू शकतो. या विश्वचषकानंतर सौदी या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतात. 35 वर्षीय सौदीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 122 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 22.59 च्या सरासरीने 162 विकेट घेतल्या आहेत.