Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamim Iqbal Health Update : तमीम इक्बालसाठी पुढील 72 तास धोक्याचे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू… 

बांगलादेशचा माजी कर्णधार 36 वर्षीय तमीम इक्बालला थेट सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. आता त्याच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी मोठी माहिती दिली आहे. पुढील 72 तास त्याच्यासाठी महत्वाचे असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 26, 2025 | 09:27 AM
Tamim Iqbal Health Update: The next 72 hours are dangerous for Tamim Iqbal, treatment is underway under the supervision of doctors...

Tamim Iqbal Health Update: The next 72 hours are dangerous for Tamim Iqbal, treatment is underway under the supervision of doctors...

Follow Us
Close
Follow Us:

Tamim Iqbal Health Update : बांगलादेशचा माजी कर्णधार 36 वर्षीय तमीम इक्बालला थेट सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली  आहे. पुढील 72 तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याची माहिती मिळत आहे.  सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. आगामी 72 तास त्याच्यासाठी महत्वाचे असणार आहे, अशी माहिती आता समोर आली  आहे.

डॉक्टरांनी काय सांगितले?

तमीम इक्बालच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याचे हृदय हळूहळू काम करू लागले आहे. परंतु, पुढील ४८ ते ७२ तास त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र, तो लवकर बरा होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात व्यस्त आहे.

हेही वाचा : Glenn Maxwell : IPL 2025 मध्ये Glenn Maxwell च्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, रोहित शर्माला केले ओव्हरटेक…

मंगळवारी आरोग्य अधिकाऱ्यांनी तमीम इक्बालची सावर हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी या अनुभवी खेळाडूच्या तब्येतीची मोठी माहिती दिली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर डिसीजेसचे संचालक अब्दुल वदुद चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील 3 दिवस त्यांना खूप काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर त्याला सुमारे 3 महिने विश्रांती घ्यावी लागेल आणि त्यानंतरच तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल.

क्षेत्ररक्षण करताना वाटू लागले अस्वस्थ..

तमीम इक्बालला क्षेत्ररक्षण करत असताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला ताबोडतोब फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर डॉ. देबाशिष चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला होता.  क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोनुसार, तमिमने ५० षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला तपासायला वैद्यकीय तज्ञ ताबडतोब हजर झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

तमीम इक्बालची क्रिकेट कारकीर्द..

तमीम इक्बालने 70 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 243 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. टेस्ट फॉरमॅटमध्ये तमिम इक्बालने 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 36.65 च्या सरासरीने 8357 धावा केल्या.

हेही वाचा : IPL 2025 : आईपीएल 2025 च्या सुरुवातीलाच ‘या’ युवा खेळाडूंनी वेधले लक्ष, केली वादळी कामगिरी…

तमिम इक्बालने बांगलादेशसाठी टी-20 फॉरमॅटमध्ये 117.20 च्या स्ट्राइक रेट आणि 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या. तमिम इक्बालने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली आहेत. याशिवाय तमिम इक्बालच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये 14 शतके आहेत. तर टी-20 फॉरमॅटमध्ये या फलंदाजाने एकदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

Web Title: Next 72 hours are dangerous for tamim iqbal health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • ICC

संबंधित बातम्या

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
1

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
2

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
3

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.