
ICC Mens Cricket World Cup 2027
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे या ठिकाणी वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. दरम्यान 1 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आयसीसी 2027 पुरुष वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. बरोबर पुढील वर्षी एका वर्षाने ऑक्टोबरच्या सुमारास वर्ल्डकप सुरू होणार आहे.
उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…
पुढील वर्षी 2 ऑक्टोबर 2027 रोजी वर्ल्डकप सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर 2027 वर्ल्डकपचा शेवट होणार आहे. तब्बल दीड महिना चालणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभात जगातील अव्वल संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. गुरुवारी केपटाऊन येथे होणाऱ्या या विशेष सोहळ्यात केवळ सामन्यांचे वेळापत्रक आणि मैदानांची नावेच घोषित केली जाणार नाहीत, तर क्रिकेट चाहत्यांसाठी विश्वचषक सामन्यांची तिकीट विक्री प्रक्रिया आणि तिकिटांचे दरही अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहेत.
2027 च्या 50 ओव्हर्सच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या महाकुंभात सहभागी होणाऱ्या १४ पैकी १० संघांची नावे येत्या ३० सप्टेंबर रोजी निश्चित होणार आहेत. आयसीसीने थेट पात्रतेसाठी ३० सप्टेंबर ही कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे.
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ (नंबर-१) अव्वल क्रमांकासह सहज पात्र ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या देशांची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…
१० संघ निश्चित झाल्यानंतर उर्वरित ४ जागांसाठी इतर देशांमध्ये ‘क्वालिफायर’ सामने रंगणार आहेत. विशेष म्हणजे, नामिबिया हा देखील या वर्ल्डकपचा सह-यजमान आहे; मात्र आयसीसीच्या नियमानुसार त्यांना थेट प्रवेश दिलेला नसून, त्यांना क्वालिफायरचा मार्ग पार करूनच मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवावा लागणार आहे.