फोटो सौजन्य - Instagram
Nitish Rana and Sachi Marwah will soon become parents : भारताचा संघ सध्या दुबईमध्ये आहे, ९ मार्च रोजी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यांमध्ये होणार आहे. तर लवकर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटचा उत्सव सुरु होणार आहे म्हणजेच आयपीएल २०२५ चा शुभारंभ २२ मार्चपासून केला जाणार आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस करण्यात आला. रिषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकेट घेतले आहे. यामध्ये यामध्ये अनेक संघाचे कर्णधार बदलले आहेत त्याचबरोबर अनेक संघाचे खेळाडू देखील बदलले आहेत. आता कोलकाता नाईट रायडर्स महत्वाचा खेळाडू नितीश राणा यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Champions Trophy 2025 Final : भारतीय संघाचं फायनलच्या सामन्यात पारडं जड, न्यूझीलंडच्या अडचणी वाढणार?
कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणा आणि त्यांची पत्नी साची मारवाह सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये त्यांनी ते लवकरच आई बाबा होणार आहेत याची माहिती दिली आहे. त्यांच्या घरी एक नव्हे तर दोन पाहुणे येणार आहेत हे ही त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर नितीश आणि साची मारवाह यांनी पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, स्टेडियमपासून ते साइट भेटींपर्यंत, आता आमच्या सर्वात मोठ्या प्रकल्पावर – लवकरच येत आहेत दोन छोटे संघमित्र! ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नितीश राणा आणि सांची मारवाह लवकरच जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांची पहिली भेट एका पार्टीत झाल्याचे वृत्त आहे. नितीशला पहिल्याच नजरेत सांचीवर प्रेम झाले, जी अभिनेत्रीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. दोघांनी २०१८ मध्ये साखरपुडा केला आणि २०१९ मध्ये लग्न केले. आता लवकरच दोघे आईबाबा होणार आहेत.
Mohammed Shami च्या रोजा वादात शमा हिने मारली उडी, एनर्जी ड्रिंक्स पिण्यावर काय म्हंटले तिने?
नितीश आणि सांचीच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. एकमेकांशी चांगले नाते असलेले नितीश आणि सांची पालक होणार आहेत आणि त्यांनी त्यांचा आनंद त्यांच्या चाहत्यांसोबतही शेअर केला. डावखुरा फलंदाज आणि अर्धवेळ ऑफस्पिनर नितीश राणा यांची कारकीर्द आव्हानांनी भरलेली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत दिल्लीच्या प्रवासात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये राणाने २९९ धावा केल्या आणि २१ षटकार मारले – स्पर्धेतील कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली नाही.