फोटो सौजन्य - ANI/X सोशल मीडिया
मोहम्मद शमी : भारताचा पुरुष संघाने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा संघ ९ मार्च रोजी भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. या सामन्याआधी भारताच्या संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे सध्या त्याला सोशल मीडियावर काही नेटकरी ट्रोल करत आहेत तर काही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला आहे. काही लोक म्हणतात की शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून चूक केली, आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद हिने प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडिया खेळणार ट्राय सिरीज, कोण-कोणते देश होणार मालिकेमध्ये सहभागी, वाचा संपूर्ण माहिती
आता शमा मोहम्मदनेही या वादात उडी घेतली आहे. शमा मोहम्मद ही तीच काँग्रेस नेत्या आहे जिने काही दिवसांपूर्वी रोहित शर्माला जाड म्हटले होते. व्हायरल झालेल्या फोटोवर शमा मोहम्मद मोहम्मद शमीचा बचाव करताना दिसली. इस्लामचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की मोहम्मद शमीने काहीही चुकीचे केले नाही. उल्लेखनीय म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात मोहम्मद शमीचा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये तो एनर्जी ड्रिंक पिताना दिसत होता. यानंतर, सोशल मीडियावरील एक वर्ग शमीला ट्रोल करत आहे.
मोहम्मद शमीशी संबंधित या वादावर शमा मोहम्मदनेही तिचे मत मांडले आहे. शमा यांनी म्हटले आहे की इस्लाममध्ये रमजानबद्दल काहीतरी विशेष आहे. प्रवास करताना उपवास ठेवण्याची गरज नाही. शमी सध्या प्रवास करत आहे. तो त्याच्या घरीही नाही. तो असा खेळ खेळत आहे ज्यामुळे त्याला खूप तहान लागू शकते. शमा पुढे म्हणाली की, खेळत असतानाही उपवास ठेवावा असे कोणीही म्हणत नाही. तुमच्या कृती अधिक महत्त्वाच्या आहेत. इस्लाम हा एक वैज्ञानिक धर्म आहे.
#WATCH | Delhi | On Indian cricketer Mohammed Shami, Congress leader Shama Mohamed says, “…In Islam, there is a very important thing during Ramzan. When we are travelling, we don’t need to fast (Roza), so Mohammed Shami is travelling and he’s not at his own place. He’s playing… pic.twitter.com/vdBttgFbRY
— ANI (@ANI) March 6, 2025
यापूर्वी, अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटले होते की, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून पाप केले आहे. तो म्हणाला की शरीयतच्या दृष्टीने शमी हा गुन्हेगार आहे आणि त्याने हे करायला नको होते. मौलाना शहाबुद्दीन यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान शमी मैदानावर एनर्जी ड्रिंक पिताना दिसला. रझावीने शमीला शरियाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, शरियाच्या नियमांचे पालन करणे ही सर्व मुस्लिमांची जबाबदारी आहे आणि इस्लाममध्ये उपवास करणे अनिवार्य आहे.