
photo - social media
Wimbledon 2026: लिंडा नोस्कोवा ठरली चॅम्पियन! पहिल्याच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर कोरले नाव
सुरुवातीच्या काही मिनिटांत नॉर्वेने इंग्लंडवर सतत दबाव ठेवला. ३६ व्या मिनिटाला आंद्रेयास शेल्डरूपने उत्कृष्ट गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.पण अवघ्या ११ मिनिटांनंतर ज्युड बेलिंगहॅमने इंग्लंडसाठी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत स्कोअर १-१ असाच राहिला. दुसऱ्या हाफमध्ये नॉर्वेने आक्रमक खेळ केला. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. पण पूर्ण वेळेपर्यंत कोणालाही गोल करता आला नाही आणि स्कोअर १-१ असाच राहिल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला.
दुसऱ्या हाफमध्ये, दोन्ही संघांनी विजयी गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु, दोन्ही संघाच्या गोलकीपरने अनेक उत्कृष्ट डिफेन्स करत ९० मिनिटांपर्यंत कोणत्याही संघाला आघाडी घेऊ दिली नाही. मात्र, अतिरिक्त वेळेत, बेलिंगहॅमने शानदार कामगिरी करत सुरुवातीलाच गोल केला. बेलिंगहॅमने ९३ व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. इंग्लंडने पुढील ३० मिनिटांसाठी ही आघाडी कायम ठेवली आणि सामना २-१ ने जिंकला. इंग्लंडने २०१८ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना गतिवजेता संघ अर्जेंटिनाशी होणार आहे.
The Three Lions claim their spot in the Semi-finals 🏴 #FIFAWorldCup — FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 11, 2026
विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही, अर्लिंग हालंडने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. तो म्हणाला की ‘आम्ही जागतिक फुटबॉल नकाशावर नॉर्वेचे नाव मजबूतीने कोरले आहे. हीच गोष्ट मला सर्वात जास्त भावूक करते. आशा आहे की, आता आम्ही युरो आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने स्थान मिळवू. आमची पिढी अप्रतिम आहे आणि यामुळे नॉर्वेच्या तरुणांना प्रेरणा मिळेल की या जर्सीमध्ये जगातील सर्वात मोठ्या मंचावर खेळणे शक्य आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘गेले सहा आठवडे आमच्यासाठी रोलर-कोस्टरपेक्षा कमी नव्हते. मला वाटते की या विश्वचषकाने नॉर्वे आणि मला दोघांनाही बदलले आहे. आता आव्हान हे आहे की ही कामगिरी कायम ठेवायची. आम्ही दाखवून दिले आहे की नॉर्वे जगातील सर्वात मजबूत फुटबॉल संघांपैकी एक असू शकतो.’