
ICC Ranking: Something that no Indian bowler had managed before..! Now, the 'mystery' spinner Varun Chakravarthy has achieved it...
Varun Chakravarthy ICC Ranking : ताज्या आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये, टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने मोठा कारनामा केला आहे. आजवर एकाही भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते चक्रवर्तीने करून दाखवले आहे. वरुण आता टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक गुणांची कमाई करणारा गोलंदाज बनला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
हेही वाचा : Messi India Tour : मेस्सीच्या शो दरम्यान गोंधळ प्रकरण! क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी दिला राजीनामा
वरुण चक्रवर्तीने ताज्या आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. तो अव्वल स्थानावर कायम असून त्याने आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे. सध्या वरुणचे ८१८ रेटिंग पॉइंट्स झाले असून हे टी-२० फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने मिळवलेले सर्वोच्च गुण ठरले आहेत. यापूर्वी, कोणत्याही भारतीय फिरकी गोलंदाजाला हा टप्पा गाठता आलेल नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिके यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिके दरम्यान वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीने हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने सहा विकेट्स चटकावल्या आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यात, वरुणने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. फक्त ११ धावांत दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
२०२५ हे वर्ष वरुण चक्रवर्तीसाठी उल्लेखनीय ठरले आहे. या वर्षी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३२ विकेट घेण्याची किमया साधली आहे. त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ६.६९राहिला होता, जो त्याच्या सातत्य आणि नियंत्रणाचे प्रतिबिंब दर्शवत आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये वरुणने १७ विकेट काढल्या आहेत.
वरुणसोबत, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या दमदार कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे. अर्शदीपने गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीमध्ये चार स्थानांनी झेप घेऊन तो १६ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने १३ धावांत २ विकेट घेतल्या होत्या.
तिलक वर्माला फलंदाजीच्या क्रमवारीत देखील मोठा फायदा झाला आहे. तो दोन स्थानांनी वर जाऊन चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर कायम असून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामनेही त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे आठ स्थानांनी पुढे सरकला आहे.