महान टेनिसपटूंपैकी एक रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. रॉजर फेडररने ग्रँडस्लॅम आणि एटीपी टूरमध्ये खेळण्याच्या संदर्भात निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. रॉजर फेडररने ट्विट करून आपल्या निवृत्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. त्याने २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. रॉजर फेडरर आपला शेवटचा सामना कधी खेळणार, हेही या पोस्टद्वारे चाहत्यांना सांगण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात लंडनमधील लेव्हर कप ही शेवटची एटीपी स्पर्धा असेल ज्यामध्ये रॉजर फेडरर भाग घेणार आहे. फेडररने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीच्या प्रवासात चाहत्यांचे आणि स्पर्धकांचे आभार मानले आणि सांगितले की, वयाच्या 41 व्या वर्षी त्याला सोडण्याची वेळ आली आहे असे वाटते. लव्हेर कप पुढील आठवड्यात 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान लंडनमध्ये होणार आहे. तो म्हणाला, ‘मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत.