Pahalgam Terrorist Attack: Problems increase in India's Bangladesh tour! Dark clouds over Asia Cup too..
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताला हादरा बसला आहे. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या हल्ल्याचा परिणाम क्रिकेट जगतावर देखील पडू लागला आहे. अशातच भारतीय संघाचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीत आता बांगलादेशने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. जे लक्षात घेता, आता हा दौरा रद्द केला जाऊ शकतो.
ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाण्याचे नियोजित होते. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार होते. सामने सामना ढाका आणि चितगाव येथे खेळवण्यात येणार होते. पण आता हा दौरा पूर्णपणे रद्द होण्याची चिन्हे आहेत. एवढेच नाही तर येणाऱ्या काळात भारताला शेजारील देशांसोबत क्रिकेट खेळणे देखील कठीण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : मागील पाच IPL सीझनमध्ये या संघाचा प्लेऑफमध्ये दबदबा! नावे पाहून व्हाल चकित
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण बघता हे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी, बांगलादेश देखील या प्रसंगी आपले भ्याड कृती करताना दिसून येत आहे. ज्यामुळे बांगलादेश दौरा रद्द होऊ होण्याची शक्यता आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा अद्याप अंतिम झालेला नाही आणि परिस्थिती पाहता तो रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. असे सांगण्यात येत आहे.
बांगलादेशचे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल एएलएम फजलुर रहमान यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर तणाव आणखी वाढलाअ आहे. ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर त्यावेळी बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर कब्जा करावा आणि त्यासाठी चीनच्या सहकार्याने लष्करी योजना बनवण्यात यावी.
ही परिस्थिती लक्षात घेता, भारताचा बांगलादेश दौरा रद्द होण्याचीच जास्त शक्यता दिसत आहे. तथापि, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय करण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर सप्टेंबर २०२५ मध्ये भारतात होणारा आशिया कपसमोरील देखील अडचणीत वाढ झाली आहे. क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, सध्याच्या राजकीय आणि राजनैतिक परिस्थिती बघता भारताला त्याच्या शेजारील देशांसोबत द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय क्रिकेट खेळणे अडचणीचे ठरू शकते.