Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण

India Bangladesh Relations : भारताचा शेजारी देश बांगलादेशत गेल्या दीड वर्षानंतर नव्या सरकारची स्थापना झाली आहे. तारिक रहमान नवे पंतप्रधान बनले असून भारताने संबंध सुधारण्यासाठी एक मोठे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 09:58 AM
Om Birla Meets Bangladesh New Pm Tarique Rahman

Om Birla Meets Bangladesh New Pm Tarique Rahman

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या शेजारी देश बांगलादेशात सत्ता बदल
  • तारिक रहमान बनले नवे पंतप्रधान
  • भारताने दिले अधिकृत भेटीचे आमंत्रण
India Bangladesh Relations : ढाका/नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश बांगलादेशात (Bangladesh) नव्या सरकारची स्थापना झाली आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी माजी सरकाच्या पतनानंतर पहिल्यांदाच देशात लोकशाही प्रक्रियेद्वारे सरकार स्थापन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने एक मोठे आणि सरकारात्मक पाऊल उचलले आहे. भारताने बांगलादेशसोबत असलेले तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

भारताचा संदेश

यासाठी भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) काल मंगळवारी  (१७ फेब्रुवारी) ढाका येथील संसदीय भवनाच्या साउथ प्लाझा मध्ये  शपथविधी सोहळ्याचे बिर्ला साक्षीदार बनले. रहमान यांच्या शपथग्रहण केल्यानंतर बिर्ला यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रहमान यांना पंतप्रधान बनल्याच्या सुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांनी भारताच्या वतीने रहमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाठवलेला वैयक्तिक संदेश दिला. या पत्रात भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीच्या भावनेचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच ओम बिर्ला यांनी रहमान यांना भारताच्या अधिकृत भेटीचे आमंत्रण दिले. त्यांनी भारत आणि बांगलादेशातील द्विपक्षीय संबंध पुन्हा नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

बांगलादेशला पाठिंबा 

ओम बिर्ला यांनी रहमान यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत, बांगलादेशला भारताकडून पाठिंबा दर्शवला. त्यांनी म्हटले की, बांगलादेशला एक लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेश राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात भारताचा पाठिंबा राहिल.

इतर मुद्द्यांवरील चर्चा 

दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि बांगलादेशच्या भविष्यात सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशांनी व्यापार, सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि प्रादेशिक स्थिरतेसारख्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर लक्ष्य केंद्रित केले.

भारत-बांगलादेश संबंधात सुधार होणार?

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये माजी शेख हसीना (Sheikh Hasina) सरकार पडल्यानंतर मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले होते. या काळात युनूस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे आणि हसीना यांच्या भारतात आश्रयामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. परंतु सध्याच्या नव्या सरकराने भारतासोबतच्या संबंधाला बळकटी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Just concluded a constructive meeting with Prime Minister of Bangladesh @trahmanbnp I handed over a personal letter from Prime Minister @narendramodi conveying his wishes to PM Rahman and inviting him to visit India at the earliest convenience. I extended warm congratulations… pic.twitter.com/gFNqLmnxsT — Om Birla (@ombirlakota) February 17, 2026


JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओम बिर्ला यांनी भारताच्या वतीने बांगलादेशला कोणता संदेश दिला?

    Ans: ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक अभिनंदन पत्र दिले. तसेच भारताच्या वतीने तारिक रहमान यांना अधिकृत भेटीचेही आमंत्रण दिले. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आशाही व्यक्त केली.

  • Que: पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांना लिहिलेल्या पत्रात काय होते?

    Ans: पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांचे पत्रातून बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. तसेच भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीच्या भावनेचा पुनरुच्चार करण्यात आला होता.

  • Que: ओम बिर्ला यांनी आणखी कोणत्या मुद्यांवर चर्चा केली?

    Ans: ओम बिर्ला यांनी रहमान यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. व्यापार, सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि प्रादेशिक स्थिरता या मुद्यांवर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.

Web Title: India bangladesh relations om birla invites tarique rahman to visit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Bangladesh
  • narendra modi
  • Om Birla
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.