Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर

IND vs PAK Asia Cup 2025: पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी दावा केला की भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अमित शहांवर खूप दबाव आहे. सोशल मीडियावर या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 14, 2025 | 06:43 PM
Pak expert Qamar Cheema said Indian Army is against IND vs PAK match

Pak expert Qamar Cheema said Indian Army is against IND vs PAK match

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांचा दावा भारतीय सैन्यालाही भारत-पाक सामना नको आहे.

  • सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांचा संताप उफाळला.

  • राजकीय वातावरण तापले विरोधी पक्ष, बळींची कुटुंबे आणि नेते सामन्याविरोधात; सरकार आंतरराष्ट्रीय नियमांचे कारण देत आहे.

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी मानला जातो. पण यंदा या सामन्याभोवती तणाव, संताप आणि राजकीय तापमान वाढलेले दिसत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात भावनांची लाट उसळली असून, सोशल मीडियावर #BoycottINDvPAK हा ट्रेंड जोर धरताना दिसतो आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक व तज्ज्ञ कमर चीमा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले  “भारतीय सैन्यालाही भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा असे वाटत नाही. ते म्हणतात, युद्धभूमीवर जेव्हा आपले जवान रक्त सांडत आहेत, तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर हातमिळवणी कशी करता येईल?”

अमित शाहांवर दबाव?

कमर चीमा पुढे म्हणतात की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हा दबाव केवळ राजकीय नाही तर जनमानसातील असंतोषाचाही आहे. सोशल मीडियावर सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी, पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आणि विरोधी पक्षांचा आवाज या सर्वामुळे सरकारवर मोठे दडपण आले आहे. मात्र, बीसीसीआयचे म्हणणे काहीसे वेगळे आहे. त्यांच्यानुसार हा सामना एका बहुपक्षीय स्पर्धेचा भाग असल्याने भारताला खेळणे बंधनकारक आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे उल्लंघन होईल. पण या स्पष्टीकरणाला जनतेने फारसे गांभीर्याने घेतले नाही.

Merely three months back India fought and won a major battle against the terrorist country Pakistan in response to a major terrorist attack by Pakistan in Pahalgam.

While I am writing this a flood relief column is out from almost every garrison of our army, that’s their duty… pic.twitter.com/xIRxNAirC8

— Major Pawan Kumar, Shaurya Chakra (Retd) 🇮🇳 (@major_pawan) August 27, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osama Bin Laden : पाकिस्तानने ओसामा बिन लादेनच्या पत्नींसोबत काय केले? झरदारींच्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

चाहत्यांचा संताप

रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. सामान्यत: भारतीय चाहत्यांची नजर सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर खिळलेली असते. परंतु यावेळी वातावरण वेगळे आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते खुलेपणाने म्हणत आहेत “आमच्या शहीदांचा अपमान करून आम्ही पाकिस्तानशी सामना खेळताना पाहू इच्छित नाही.” त्यामुळे हा सामना केवळ खेळापुरता न राहता तो देशभक्ती, राजकारण आणि जनभावना यांच्या मोठ्या वादळात अडकला आहे.

राजकीय पक्षांचा आवाज

या मुद्द्यावर राजकारण देखील चांगलेच तापले आहे. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे या सामन्याचा विरोध केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात या सामन्याचा निषेध करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे म्हणाले “आपले जवान सीमारेषेवर रोज प्राण देत आहेत, अशा वेळी आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले पाहिजे का?” विरोधी पक्षांचाही सूर साधारण हाच आहे. शहीदांच्या कुटुंबीयांच्या भावना आदराने मान्य केल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?

सरकारची भूमिका

सरकारच्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, भारताला हा सामना रद्द करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने करारबद्ध अटींमुळे संघाने मैदानात उतरावेच लागणार आहे. तरीही विरोधक आणि नागरिक या भूमिकेवर समाधानी नाहीत. भारत-पाक सामना हा नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी भावनिक असतो. पण यंदा हा सामना केवळ क्रीडा नाही, तर राष्ट्रीय भावना, राजकीय वाद आणि शहीदांच्या बलिदानाशी जोडला गेला आहे. खरं तर, खेळ आणि राजकारण वेगळे ठेवावे असे वारंवार सांगितले जाते. मात्र जेव्हा हल्ल्यांचे जखमे अजून ताज्या असतात, तेव्हा लोकांची भावनिक प्रतिक्रिया अटळ असते. आता १४ सप्टेंबरला मैदानावर सामना होईलच, पण त्याबरोबरच देशभरात सुरू असलेला विरोधाचा सामना सरकारला अधिक कठीण ठरणार आहे.

Web Title: Pak expert qamar cheema said indian army is against ind vs pak match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • India vs Pakistan
  • Indian Armed Forces
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

INDvsPAK Live : पाकिस्तानचे मॅचनंतरचे चित्र भारतात मॅचपूर्वीच; देशात रस्त्यावर फुटले TV
1

INDvsPAK Live : पाकिस्तानचे मॅचनंतरचे चित्र भारतात मॅचपूर्वीच; देशात रस्त्यावर फुटले TV

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण
2

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…
3

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…

बॉयकॉटमुळे सामन्याचा थरार फिका पडला का? IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर
4

बॉयकॉटमुळे सामन्याचा थरार फिका पडला का? IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.