Babar Azam, Pakistan vs West Indies, Saeed Anwar, Most Centuries, Most Runs, ODI Records, बाबर आझम, पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, सईद अन्वर, सर्वाधिक शतक, सर्वधिक धावा, एकदिवसीय विक्रम
PAK vs WI : पाकिस्तान क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथे पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ असा असा विजय संपादन केला आहे. आता पाकिस्तान वेस्ट इंडिजविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला आज म्हणजेच ८ ऑगस्टपासून सुरवात होणारआहे. या मालिकेत, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला या मालिकेत एक मोठा विक्रम करण्याची संधी चालून आली आहे.
बाबर आझम हा पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. बाबर आझमने पाकिस्तानकडून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून तो पाकिस्तानचा मुख्य चेहरा बनला आहे. त्याने पदार्पणापासून पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा आणि शतके केली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, बाबरला पाकिस्तानच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असणाऱ्या सईद अन्वरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे.
सईद अन्वर हा पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा फलंदाज आहे. अन्वरने त्याच्या कारकिर्दीत २० शतके ठोकली आहेत. बाबर आझमने एकदिवसीय सामन्यात १९ शतके झळकावली आहेत. जर त्याने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आणखी दोन शतके लगावली तर तो सईद अन्वरचा विक्रम मोडीत काढेल आणि पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरणार आहे.
२०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बाबर आझमने १३१ एकदिवसीय सामने खेळेल आहेत. १२८ डावांमध्ये ६,२३५ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १९ शतके आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत. तो सईद अन्वरनंतर पाकिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.
सईद अन्वरच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्याने १९८९ ते २००३ दरम्यान २४७ एकदिवसीय सामन्यांच्या २४४ डावांमध्ये ८,८२४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २० शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. सईद अन्वरने २१ मे १९९७ रोजी १९४ धावांची खेळी खेळली होती. २०१० पर्यंत ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी वैयक्तिक धासंख्या ठरली होती. २०१० मध्ये सचिन तेंडुलकरने २०० धावा करून अन्वरचा विक्रम मोडीत काढला होता. हे एकदिवसीय सामन्यातील पहिले द्विशतक ठरले होते.
हेही वाचा : ‘तो’ जगातील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक! आशिया कपपूर्वी पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या विधानाने उडाली खळबळ..