वसीम अक्रम(फोटो-सोशल मीडिया)
Wasim Akram’s commentary on Babar Azam:भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली असून आता सर्वांचे लक्ष्य आशिया कप २०२५ कडे लागला आहे. आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. अशातच आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने आशिया कपपूर्वी मोठे विधान केले आहे. आशिया कपमध्ये कसलेले संघ मैदानावर एकमेकांसमोर येणार आहेत. यामध्ये येतील आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होईल. त्यापूर्वीच वांशिक अक्रमने संघात एका वरिष्ठ फलंदाजाची गरज असल्याची भाषा केली आहे.
हेही वाचा : Vaibhav Suryavanshi मुळे Sanju Samson सोडतोय का राजस्थान राॅयल्स? मोठे कारण आले समोर
क्रिकेट पाकिस्तानबद्दल बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, “आशिया कप आणि नंतर टी-२० विश्वचषक देखील जवळ येत आहे अशावेळी आपल्याला एका वरिष्ठ फलंदाजाची गरज आहे. चाहत्यांच्या आठवणीत हे असेल की, २०१९ मध्ये जेव्हा बाबर आझम सोमरसेटकडून खेळत होता तेव्हा त्याने सुमारे १५० च्या स्ट्राईक रेटने धावा फाटकावल्या होत्या. परिस्थितीनुसार त्याच्या फलंदाजीशी जुळवून घेण्याची क्षमता बाबरकडे आहे.”
वसीम अक्रमने बाबरला जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक संबोधले आहे. वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असून तो परिस्थितीनुसार त्याचा खेळ जुळवून घेत असतो. त्याने हे यापूर्वी देखील करून दाखवले आहे. भविष्यात देखील तो करू शकतो. तो पाकिस्तानसाठी बरेच काही करण्यास सज्ज आणि सक्षम आहे. आपण सर्वांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा.
आशिया कपची १७ वी आवृत्तीचा थरार ९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. सलामी सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग असा होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळवला जाणार आहे. भारत हा आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. ज्याने १६ आवृत्त्यांमध्ये जास्तीत जास्त आठ वेळा विजेतेपद आपल्या नावे केले आहे. त्यानंतर श्रीलंकेचा नंबर लागतो. ज्याने सहा वेळा आशिया कप विजेतेपद जिंकले आहे. त्यानंतर तिसऱ्यास्थानी पाकिस्तान संघ आहे. पाकिस्तानने दोनदा विजेतेपदावर नवकोरले आहे.