Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…

Eng Vs Pak: इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानने दोन कसोटी सामने पराभवाचा सामना केला आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 02:23 PM
pakistan cricket board

pakistan cricket board

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इमाम उल हकवर बंदी घालण्याची शक्यता
  • इमाम उल हकने दुखापतीचे नाटक केल्याचा संशय
  • लॉर्डस टेस्टनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ 
Eng Vs Pak Test Series: इंग्लंड दौऱ्यावरील लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानी क्रिकेट संघाला मिळालेल्या एकतर्फी आणि लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे राजकीय आणि प्रशासकीय वादळ उठले आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टेस्ट सिरिजमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच आता इमाम उल हक वर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बंदी घालण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानने दोन कसोटी सामने पराभवाचा सामना केला आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दारुण पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. संघातील सात महत्त्वाच्या खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. मायदेशी परत पाठवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये दुखापतग्रस्त झालेला सलामीवीर फलंदाज इमाम-उल-हक आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्या नावांचा समावेश असल्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

लॉर्ड्स कसोटीदरम्यान इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदानातून बाहेर पडला होता. मात्र, तो खरोखरच दुखापतग्रस्त आहे की संघातून काढता पाय घेण्यासाठी त्याने दुखापतीचे बनावट नाटक रचले, असा गंभीर आरोप आता त्याच्यावर होत आहे. क्रीडा वर्तुळात आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून इमामच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीसीबी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. आरोप सिद्ध झाल्यास इमाम-उल-हकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेटकिपर अन् फलंदाज मोहम्मद रिझवान याला अचानक मायदेशी बोलावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या अचानक झालेल्या हकालपट्टीमुळे रिझवानची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप

एकाच वेळी सात खेळाडूंना दौऱ्यावरून थेट मायदेशी परत पाठवण्याच्या पीसीबीच्या या अनपेक्षित आणि कठोर निर्णयामुळे संपूर्ण संघात भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉर्ड्समधील पराभवानंतर बोर्ड आता संघात अमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असून येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Pakistan cricket board chance to ban imam ul haq due to fake injury against test match in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Imam ul Haq
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan vs England

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.