PAK-AFG WAR: ICC's 'that' statement angered Pakistan! Afghan cricketers' death case; Read in detail
PAK-AFG WAR : अलीकडेच पाकिस्ताननकडून अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जगाला हादरा बसला आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणी खेळाडूंच्या मृत्यूप्रकरणी टिप्पणी केली आहे. याबाबत आता पाकिस्तानला मिरची झोंबली आहे. नेमकं प्रकरण काय ते पाहूया.
पाकिस्तान सरकारचे माहिती मंत्री अता तरार यांनी अफगाणिस्तानातील तीन क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विधान पक्षपाती असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी पक्तिका प्रांतात झालेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला, परंतु त्यांच्या निवेदनात पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रिकोणी मालिकेतून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या क्रिकेट संघटनांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा : ENG vs NZ : आदिल रशीदच्या फिरकीपुढे न्यूझीलंड बेहाल! इंग्लंडची टी-२० मालिकेत आघाडी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) नंतर जाहीर केले की, ते त्रिकोणी मालिकेसाठी अफगाणिस्तानऐवजी झिम्बाब्वेला खेळवतील. या स्पर्धेतील तिसरा संघ श्रीलंका आहे. तरार यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटू मारले गेल्याचा दावा करणाऱ्या आयसीसीच्या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि तो आम्ही नाकारतो. आयसीसीने अफगाणिस्तान बोर्डाच्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची तसदी घेतली नाही आणि हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत एक निवेदन जारी केले. मंत्री म्हणाले की, पाकिस्तान स्वतः वर्षानुवर्षे दहशतवादाचा बळी आहे आणि त्यांनी आयसीसीला त्यांचे विधान दुरुस्त करण्यास सांगितले.
हेही वाचा : मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर
हे विचित्र आहे की आयसीसीच्या विधानानंतर काही तासांतच आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तेच शब्द पुन्हा सांगितले आणि अफगाणिस्तान बोर्डानेही असेच शब्द वापरले. अफगाणिस्तान बोर्डाने कोणतेही खरे पुरावे सादर न करता एक निवेदन जारी केले. रशीद खान आणि गुलबदीन नायब यांच्यासह अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हवाई हल्ल्याचा आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंचा तीव्र निषेध केला.