शुभमन गिल आणि कुलदीप यादव(फोटो-सोशल मीडिया)
Diwali 2025 brought good news : देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दिवाळी सणाने या वर्षी अनेक भारतीय खेळाडूंच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले आहेत. अनेक भारतीय खेळाडूंचे भाग्यही तेजस्वी झाले. दिवाळीपूर्वी ज्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात झाली. नेमकं काय झालं याबाबत आपण माहिती घेऊया.
बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्त झालेले मिथुन मनहास यांच्या आयुष्यात या दिवाळीत आनंदाची बातमी आली आहे. मनहास बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वी जम्मूचा क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची फारशी कुणाला माहिती नव्हती. पण त्याने बीसीसीआयचा पदभार स्वीकारताच त्याचे नाव क्रिकेट चाहत्यांमध्ये घराघरात पोहोचले आहेत. आता, भारत आणि इतर देशांतील लोक देखील त्याला ओळखायला लागले आहेत. या दिवाळीने त्याला पद, प्रसिद्धी आणि संपत्तीपासून सर्वकाही मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली आहे.
या यादीत दूसरा क्रमांक भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा येतो. गिलसाठी देखील ही दिवाळी खूप खास आहे. कारण, दिवाळी सणापूर्वी, शुभमन गिल कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये देशाचा कर्णधार बनला आहे. शुभमन गिल सध्या टी-२० फॉरमॅटचा उपकर्णधार देखील आहे. शिवाय, शुभमन गिलने कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याच्या कामगिरीत देखील मोठी सुधारणा झाली आहे.
दिवाळीच्या या सणाने कुलदीप यादवच्या आयुष्यात देखील आनंदाची बातमी मिळाली आहे. सातत्याने चांगली कामगिरी करून देखील ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला कसोटी फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नव्हती. परंतु, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, आशिया कपमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्याला कसोटी फॉरमॅटमध्ये देखील एक संधी दिली त्याने या संधीचे सोने केले. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि एकूण १२ विकेट्स चटकावल्या आहेत. त्याने अहमदाबाद येथील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून चार विकेट्स घेतल्या, तर दिल्ली कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या. ही दिवाळी त्याच्यासाठी आनंदाची ठरली आहे.