IND Vs PAK Champions Trophy 2025: भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला; भारताला विजयासाठी 242 धावांची गरज
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू आहे. दरम्यान सर्वात प्रथम पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताला 242 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताला 50 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे. पाकिस्तानची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही, मात्र नंतर मोहम्मद रिझवान आणि साउद शकिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 100 धावांची भागीदारी रचली.
शतकी भागीदारी केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानचा संघ 49.2 ओव्हर्समध्ये ऑल आउट झाला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी खूप संथ गतीने फलंदाजी केली. मात्र भारतासाठी देखील हे आव्हान सोपे नसणार आहे. कारण खेळपट्टी थोडीशी संथ वाटत आहेत. त्यामुळे यावर फलंदाजी करणे तितके सोपे नसणार आहे.
Innings Break!
A fine bowling display from #TeamIndia and Pakistan are all out for 2⃣4⃣1⃣
3⃣ wickets for Kuldeep Yadav
2⃣ wickets for Hardik Pandya
A wicket each for Axar Patel & Ravindra JadejaOver to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND |… pic.twitter.com/Xo9DGpaIrX
— BCCI (@BCCI) February 23, 2025
हार्दिक पंड्याने बाबर आझमची विकेट काढून भारताला सुरुवात करून दिली. लागोपाठ 2 विकेट गेल्या, मात्र त्यानंतर साउद शकिल आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून डाव सावारण्याचा प्रयत्न केला. मात्र धावगती वाढवण्यात त्यांना अपयश आले. कुलदीप यादवने आपल्या 10 ओव्हर्सनध्ये 3 विकेट घेतल्या.
पाकिस्तानविरुद्ध या भारतीय फलंदाजांच्या नावावर सर्वाधिक धावा
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (२५२६) सचिन तेंडुलकरने केल्या आहेत, जो आता निवृत्त झाला आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये, कर्णधार रोहित शर्माच्या नावावर शेजारच्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्ध १९ सामन्यांमध्ये ५१.३५ च्या प्रभावी सरासरीने ८७३ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.१५ च्या प्रभावी सरासरीने ६७८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा होती. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने आठ सामन्यांमध्ये फक्त २१८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक आले, जिथे ५० धावा हा त्याचा सर्वोच्च धावसंख्या होता.
IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध या भारतीय फलंदाजांच्या नावावर सर्वाधिक धावा, पाक संघाच्या अडचणी वाढणार
दुबईमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व
दुबईच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. येथे खेळल्या गेलेल्या ७ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ६ जिंकले आहेत तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. या मैदानावर संघाने पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. संघाची ही कामगिरी पाहता, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये २५,००० प्रेक्षकांच्या गर्दीमुळे पाकिस्तानवर निश्चितच दबाव असेल.