फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट स्पर्धा ही जगातील सर्वात रोमांचक स्पर्धांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा जगभरातील लाखो चाहते हा शानदार सामना पाहण्यासाठी उत्सुक असतात. फक्त क्रिकेट चाहतेच नाही तर देशामधील अनेक दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रामधील व्यक्तिमत्व हा सामना पाहण्यासाठी वेळ कडून स्टेडियममध्ये जातात. भारताच्या संघाचा शेवटचा सामना हा T२० विश्वचषक २०२४ मध्ये झाला होता यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता.
DC vs UPW : मेग लॅनिंग आणि दीप्ती शर्मा आमनेसामने, अजूनही युपी वॉरियर्स पहिल्या विजयाच्या शोधात
दोन्ही देश आता आणखी एका आयसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर येण्यास उत्सुक आहेत, जिथे २३ फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये आणखी एक सुपरहिट सामना होणार आहे. भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, शुभमन गिल सारखे दमदार फलंदाज आहेत तर पाकिस्तानच्या संघामध्ये बाबर आझम, रिझवानसारखे खेळाडू आहेत. आता पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय भारतीय खेळाडूंवर एक नजर टाकूया.
तथापि, पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (२५२६) सचिन तेंडुलकरने केल्या आहेत, जो आता निवृत्त झाला आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये, कर्णधार रोहित शर्माच्या नावावर शेजारच्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्ध १९ सामन्यांमध्ये ५१.३५ च्या प्रभावी सरासरीने ८७३ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.
Yuvraj Singh said – “If Rohit Sharma is in form, he will score a Century in 60 balls in ODIs, that is his Quality. Once he gets going, it’s just about fours but also hitting Sixes with so much ease. Even if someone bowls at 145-150 kmph, Rohit has the ability to hook it… pic.twitter.com/EeiQKM3UP6
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 22, 2025
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.१५ च्या प्रभावी सरासरीने ६७८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा होती. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने आठ सामन्यांमध्ये फक्त २१८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक आले, जिथे ५० धावा हा त्याचा सर्वोच्च धावसंख्या होता.
दुबईच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. येथे खेळल्या गेलेल्या ७ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ६ जिंकले आहेत तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. या मैदानावर संघाने पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. संघाची ही कामगिरी पाहता, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये २५,००० प्रेक्षकांच्या गर्दीमुळे पाकिस्तानवर निश्चितच दबाव असेल.