Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…

Eng vs Pak: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेत संघात तब्बल अर्ध्याहून अधिक खेळाडू बदलले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 02:29 PM
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटीचा तिसरा दिवस 
  • पाकिस्तानचा संघ 133 रन्सवर झाला ऑल आउट 
  • सॅम अयूबच्या नावावर नकोसा रेकॉर्ड 
England Vs Pakistan: सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांमधील शेवटचा सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात देखील पाकिस्तान ढेपाळले आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर देखील पाकिस्तानच्या खेळामध्ये काहीही बदल दिसून आला नाहीये. मात्र यामध्ये फलंदाज सैम अयुब सध्या अत्यंत खराब फॉर्ममुळे आणि एका नकोशा विक्रमामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 133 रन्सवर ऑल आउट झाला आहे.

सुमारे 614 दिवसांच्या प्रदीर्घ काळाने कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या सैम अयुबकडून पाकिस्तानला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मैदानात आल्यावर तो 10 बॉल सुद्धा धड खेळू शकला नाही. एकही रन न करता तो शून्यावर आउट झाला. कायम शून्यावर आउट होण्याच्या प्रयत्नामुळे तो आपल्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड करतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. सलामीला खेळण्यासाठी येऊन देखील तो पाकिस्तानला एक भक्कम सुरुवात देण्यास अपयशी ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेत संघात तब्बल अर्ध्याहून अधिक खेळाडू बदलले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल केले गेले. मात्र पाकिस्तानची अवस्था आहे तशीच राहिली आहे. सलामीची धुरा सांभाळणारा सैम अयुब आगामी सामन्यांमध्ये या खराब फॉर्ममधून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करू शकतो की या नकोशा विक्रमाचा भाग बनतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…

सैम अयुबने यापूर्वी आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. बर्मिंगहॅम कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु सलामीला आलेल्या अयुबला १० बॉल खेळून देखील एकही रन करता आलेली नाही.

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप

पाकिस्तानची फलंदाजीची वाईट अवस्था झाल्याचे दिसून आले. पाचव्या स्थानावर कर्णधार बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरला. आज बाबर आझम चांगली खेळी करेल अशी अपेक्षित होते. मात्र तो देखील अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये केवळ 7 रन्स करून तो आउट झाला. तो केवळ एक फोर मारू शकला. जोश टंगच्या बॉलवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला.

Web Title: Pakistan saim ayub play test afterv 614 days and out only 10 ball against england test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan vs England

संबंधित बातम्या

ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…
1

ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…

Pak Vs Eng: आता नसलेली लाज राखण्याची संधी; Babar Azam अन् संघ इंग्लंडविरुद्ध सज्ज
2

Pak Vs Eng: आता नसलेली लाज राखण्याची संधी; Babar Azam अन् संघ इंग्लंडविरुद्ध सज्ज

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
3

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप
4

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.