Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड

पाकिस्तानच्या कर्णधाराने फातीमा सनाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. सलामीची फलंदाज गुल फिरोजाने 52 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 09:09 PM
गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान महिला संघाचा शेवट गोड
  • पाकिस्तानकडून नेदरलँड्सचा पराभव 
  • गुल फिरोजाने केल्या 63 रन्स 
Pakistan Womens Vs Nedarlands W: आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्सचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. पाकिस्तानने नेदरलँड्सच्या संघाला 89 रन्सवर ऑल आउट केले. पाकिस्तानने या स्पर्धेत आपला पहिला विजय प्राप्त केला आहे.

महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी एक अतिशय रंजक आणि विचित्र सामन्याची नोंद झाली. पाकिस्तानने आज आपला शेवटचा साखळी सामना खेळला. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नवख्या नेदरलँड्सचा पराभव केला आहे. नेदरलँड्सचा 37 रन्सने पराभव झाला आहे. दोन्ही संघांचे वर्ल्डकपमधील आव्हान संपले आहे.

पाकिस्तानने याधीचे सर्व साखळी सामने गमावले आहेत. पाकिस्तानच्या संघासाठी वर्ल्डकप स्पर्धा अत्यंत खडतर अशी ठरली. एकाही सामन्यात विजय न मिळवलेल्या पाकिस्तानच्या संघाने नेदरलँड्सचा 37 रन्सने पराभव केला आहे. पाकिस्तानने नवख्या आणि आयसीसी रँकिंगमध्ये १४ व्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सचा पराभव केला आहे.

NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

पाकिस्तानच्या कर्णधाराने फातीमा सनाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. सलामीची फलंदाज गुल फिरोजाने 52 बॉलमध्ये 63 रन्सची खेळी केली. तसेच आयेशा जफरने 32 रन्स केल्या. दोन्ही फलंदाजांनी 79 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला चांगली आघाडी मिळवून दिली. मात्र बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. नेदरलँड्सचे पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 126 रन्सवर रोखले.

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?

127 रन्सचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा डाव 89 रन्सवर ऑल आउट झाला. नेदरलँड्सची कर्णधार बाबेट लीडेने 30 तर हेदरने 24 रन्स केल्या. बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. या डावातील सर्वात अजब गोष्ट म्हणजे नेदरलँड्सच्या तब्बल ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. आज पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा शेवटचा सामना होता. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मात्र शेवटच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवून आपल्या महिमेचा शेवट गोड केला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा पहिला पराभव केला होता.

नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.

भारत – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्री चरानी, ​​यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

Web Title: Pakistan womens beat nedarlands by 37 runs and win last match t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Nedarland
  • Pakistan Cricket team
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू
1

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू

अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण
2

अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण

क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?
3

क्रिकेटविश्व हादरले! ‘या’ संघाच्या हेडकोचने दिला तडकाफडकी राजीनामा, नेमका विषय तरी काय?

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर
4

उरली सुरली लाज संपली! एकही सामना न जिंकता Pakistan सह ‘हे’ संघ Women’s T20 World Cup मधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.