अर्धशतकानंत पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर 'गन सेलिब्रेशन' (Photo Credit- X)
Sahibzada Farhan Gun Celebration: आशिया कप सुपर ४ चा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने दोन, तर हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने आपल्या चार षटकांत ४५ धावा दिल्या.
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूने पुन्हा एकदा लाजिरवाणी कृती केली आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ‘गन सेलिब्रेशन’ करून सर्वांनाच धक्का दिला. पाकिस्तानी फलंदाजाने अतिरेक्यांसारखा आनंदोत्सव साजरा केल्यामुळे क्रीडाविश्वात नवा वाद निर्माण झाला आहे.
This is how sahibzada farhan celebrated his half century, signifying his bat as Ak 47 and pointing it towards Indian Dug out.
Modi ji if this is not an act of war, what is ?
Stop this match and attack pakistan asap or else resign.
— Jitesh (@Chaotic_mind99) September 21, 2025
या सामन्यात साहिबजादा फरहानला दोन वेळा जीवदान मिळाले होते. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवरही अभिषेक शर्माने त्याचा झेल सोडला, आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यामुळे त्याला ६ धावा मिळाल्या. अखेरीस शिवम दुबेने त्याला बाद केले. बाद होण्यापूर्वी या पाकिस्तानी खेळाडूने ४५ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली.
आशिया कप २०२५ च्या याच सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर जमां केवळ १५ धावांवर बाद झाला. त्याला भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवर बाद केले. विकेटकीपर संजू सॅमसनने त्याचा झेल पकडला. मात्र, बाद ठरवल्यानंतरही फखर जमां खूप नाराज दिसला.
चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून खाली पडला होता, असे त्याचे म्हणणे होते, पण तरीही सॅमसनने तो पकडला. मैदानातील अंपायरने स्पष्ट निर्णयासाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. तिसऱ्या अंपायरने तो झेल योग्य ठरवल्यानंतरही फखर जमां हैराण झाला. त्याला वाटत होते की झेल स्वच्छ नव्हता, परंतु अखेर त्याला मैदान सोडावे लागले.