Rohit sharma and KL Rahul (PhotoCredit- X)
Rohit Sharma Started Practice With KL Rahul: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जोरदार सराव सुरू केला आहे. त्याने बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) येथे सराव करण्यास सुरुवात केली असून, या वेळी त्याच्यासोबत संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुल (KL Rahul) देखील होता. या दोन्ही खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
केएल राहुलला ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय ‘ए’ संघात स्थान देण्यात आले आहे. या सामन्यापूर्वी राहुल आपली लय परत मिळवण्यासाठी कसून मेहनत करत आहे. दुसरीकडे, व्यस्त क्रिकेट हंगामापूर्वी आपली तयारी पक्की करण्यासाठी रोहित शर्माही मैदानात उतरला आहे.
As part of their preparation for the upcoming assignments, Rohit Sharma and KL Rahul trained at the BCCI Centre Of Excellence focusing on skills and strength training 💪
Both players simulated the different conditions on offer at the CoE during their stint 👍 👍@ImRo45 |… pic.twitter.com/Ho6YE2011v
— BCCI (@BCCI) September 21, 2025
बीसीसीआयने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, आगामी स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये कौशल्य आणि ताकदीच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रावर उपलब्ध विविध परिस्थितींमध्ये दोन्ही खेळाडूंनी सराव केला.
Asia Cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर