
A major blow for Pakistan before the T20 World Cup! Star player and fast bowler suffers injury.
Shaheen Afridi is out of the BBL 2025-26 : टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतग्रस्त झाला आहे. शाहीन शाह आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत असून ब्रिस्बेन हीटकडून खेळणारा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक टी-२० लीगमध्ये २७ डिसेंबर रोजी अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानी एकदिवसीय कर्णधार शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या कार्टिलेजला दुखापत झाली आहे. त्यानंतर ब्रिस्बेन हीटने पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून उपचारांसाठी त्याच्या मायदेशी परतण्यासाठी करार झाला आहे. पीसीबी या प्रमुख खेळाडूला २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शाहीनकडून टेलिकॉम एशिया स्पोर्टला सांगण्यात आले की, तो बुधवारी रवाना होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस तो लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन सुरू करणारा आहे. शाहीनने टेलिकॉम एशिया स्पोर्टवर म्हटले आहे की, “माझी दुखापत गंभीर नाही, परंतु मला लाहोरला परतण्यास सांगितले गेले आहे. जिथे माझे पुनर्वसन सुरू होणार असून मला विश्वास आहे की एका आठवड्याच्या पुनर्वसनानंतर, मी पुढील १० दिवसांत गोलंदाजी करणार आहे.”
ब्रिस्बेन हीटकडून शेअर करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनमध्ये, शाहीन म्हणाला की, “मला ब्रिस्बेनकडून खेळण्याचा आनंद झाला आहे. मला दुःख आहे की मी संघासोबत हंगाम पूर्ण करू शकणार नाही. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी असून संघाच्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांच्या अद्भुत आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. बीबीएल अगदी माझ्या कल्पनेप्रमाणेच होते. मी माझ्या पुनर्प्राप्तीदरम्यान संघाचा जयजयकार करणार आहे. मला आशा आहे की आपण पुन्हा भेटू.”
एका सूत्राकडून सांगण्यात आले की, पीसीबी शाहीनला राष्ट्रीय संघाच्या गोलंदाजी युनिटचा एक महत्त्वाचा भाग मानते. बोर्डाचा असा विश्वास आहे की आफ्रिदीला योग्य पुनर्वसनाची आवश्यकता असून ज्यासाठी लाहोर हे सर्वोत्तम ठिकाण असणार आहे. पीसीबीने पाकिस्तानी संघातील दुखापतींच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रसिद्ध क्रीडा औषध तज्ज्ञ डॉ. जावेद मुघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.