सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav has now passed the fitness test : भारताने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. या मालिकेत भारतीय संघाने युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. तेंडुलकर- अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. आता भारतीय संघाचे लक्ष्य ९ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप २०२५ कडे लागले आहे. त्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. यावेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवल जणार असून यूएईमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. अशातच आशिया कप २०२५ पूर्वी भारतीय गोटात आनंद भरणारी बातमी समोर आली आहे. भारताचा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादव आता फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे.
भारताच्या आशिया कप संघाची निवड यद्यप करण्यात अल्ले नाही. या संघांची निवड करण्यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या बैठकीपूर्वी, टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधार सूर्यकुमार यादवने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. शेवटचा सूर्यकुमार आयपीएलमध्ये खेळला होता आणि त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले होते. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे उजव्या खालच्या ओटीपोटात स्पोर्ट्स हर्नियासाठी या आक्रमक फलंदाजावर शस्त्र क्रिया करण्यात आली होती.
हेही वाचा : AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ जाहीर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ नवीन चेहऱ्यांची लागली वर्णी
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर खेळण्यासाठी परतण्यापूर्वी (आरटीपी) फिटनेस चाचणी अनिवार्य आहे. सूर्यकुमारने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, उजव्या खालच्या ओटीपोटात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर मी आधीच बरा होत आहे हे कळवण्यास आनंद होत आहे. मी परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तंदुरुस्ती परत मिळवल्यानंतर, हा स्टायलिश फलंदाज आता मंगळवारी मुंबईत होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळला जाईल, ज्यामध्ये भारत १० सप्टेंबर रोजी यजमान संघाविरुद्ध मोहीम सुरू करेल, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होईल.
हेही वाचा : RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम