भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत हा जागतिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करून आपला दबदबा निर्माण करीत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला ऋषभ पंत हा सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. पंत आणि उर्वशी या दोघांमध्ये वाद सुरु असताना आता ऋषभने उर्वशी रौतेलासाठी एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री उर्वशीने एका मुलाखतीत ‘मिस्टर आरपी’बद्दल एक किस्सा सांगितला होता, त्यानंतर हा वाद सुरू झाला. आता पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर आणखी एक नवीन स्टोरी शेअर केली आहे जी या वादाशी जोडली जात आहे. पंतने आपल्या स्टोरी मध्ये जो फोटो ठेवला आहे, त्यात लिहिले की, जे तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींवर तुम्ही ताण देऊ नका.
उर्वशी रौतेलाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. आरपी मला भेटायला आला होता आणि तो लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. मात्र मी शुटिंगमध्ये व्यग्र होते. नंतर मी थकून झोपले. मात्र मला 16 ते 17 मिसकॉल आले होते. आरपी अनेक तास माझी वाट पाहत होता मात्र मी त्याला भेटू शकले नाही यामुळे मी नाराज होते. त्यानंतर मी त्याला मुंबईत भेटू असे सांगितले. आम्ही मुंबईत भेटलो. मात्र या दरम्यान माध्यमांनी आम्हाला गाठले. त्यानंतर आमचे नाते संपले असेही ती म्हणाली.