Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 RCB vs PBKS Final: “… स्पर्धेची पुनरावृत्ती होणार”; श्रेयस अय्यरने फायनलआधी रजत पाटीदारला डिवचलं

Shreyas Iyer Vs Rajat Patidar: आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजेच ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 07:16 PM
IPL 2025 RCB vs PBKS Final: “… स्पर्धेची पुनरावृत्ती होणार”; श्रेयस अय्यरने फायनलआधी रजत पाटीदारला डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 RCB vs PBKS: आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजेच ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज ७.३० वाजता सुरू होणार आहे. याआधी विराट कोहलीच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. यंदा आयपीएलच्या हंगामात नवा विजेता मिळणार आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी कर्णधार श्रेयस अय्यरने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला डिवचले आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला 6 महिन्यांपूर्वीची आठवण काढत डिवचले आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मध्यप्रदेशचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. तेव्हा रजत पाटीदार हा मध्यप्रदेशचा कर्णधार होता.

काय म्हणाला श्रेयस अय्यर? 

मला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची आठवण झाली. मी रजतला भेटलो तेव्हा त्याला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची पुनरावृत्ती होणार असे म्हणालो. श्रेयस अय्यर अंतिम सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलत होता.

Virat Kohli ला इतिहास रचण्याची संधी

विराट कोहली इतिहास रचण्याच्या जवळ..

विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात ८६ धावा केल्या तर तो तीन वेगवेगळ्या आयपीएल हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनू शकतो. विराट कोहलीने यापूर्वी आयपीएल २०१६ मध्ये ९७३ आणि आयपीएल २०२४ मध्ये ७४१ धावा केल्या होत्या. याशिवाय कॅरिबियन खेळाडू ख्रिस गेलने २०१२ आणि २०१३ च्या आयपीएल हंगामात दोन वेळा सलग ७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

आरसीबीची चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक

आरसीबी आयपीएल २०२५ मध्ये चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी, त्यांनी आयपीएल २००९, आयपीएल २०११ आणि आयपीएल २०१६ मध्ये आयपीएलचा अंतिम सामन्यात धडक मारली होती.  परंतु तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, यावेळी आरसीबीला कोणत्याही परिस्थित आजचा सामना जिंकावा लागणार आहे.  जर यावेळी अंतिम सामना जिंकला तर आरसीबी १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद नावावर करणार आहे.

हेही वाचा : फलंदाजी बेतली जिवावर! क्रिकेट मैदानावरच १२ वर्षांच्या मुलाचा करूण अंत, वाचा सविस्तर..

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांविरुद्ध आमनेसामने आले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामना जिंकला आहे. तर पंजाब किंग्जने त्याच १८ सामन्यांमध्ये विजय आपल्या नावे केला आहे.  म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान आहेत. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस एकूण तीन वेळा समोरासमोर भिडले आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. तर त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने पंजाबचा पराभव  केला आहे.

 

Web Title: Pbks captain shreyas iyer remind sayyad mushtak ali final before ipl 2025 final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB Vs PBKS
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
1

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर!
2

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.