फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants match report : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स पाणी पाजलं आहे. कोलकाता नाईट राइडर्सला लखनौ सुपर जायंट्सला ४ धावांनी पराभूत केले आहे. केकेआरचा हा या स्पर्धेचा या विजयासह तिसरा पराभव आहे तर लखनऊचा हा या स्पर्धेचा तिसरा विजय आहे. आजच्या सामन्यांमध्ये लखनौच्या फलंदाजांनी धुव्वादार फलंदाजी केली होती पण गोलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाही आणि त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी क्विंटन डी कॉकने संघासाठी नऊ चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. तर सुनील नारायणने संघासाठी 13 चेंडूंमध्ये तीस धावा केल्या, यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार मारले. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ३५ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले. रिंकू सिंहने १५ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या तर वेंकटेश अय्यरने संघासाठी महत्वाची ४५ धावांची खेळी खेळली.
लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर लखनौ सुपर जायंट्सने अॅडम मार्कराम आणि मिशेल मार्श यांनी दमदार सुरुवात करून दिली. मार्कराम आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी १०.२ षटकांत ९९ धावा जोडल्या. मार्करामने २८ चेंडूत ४७ धावा फटकावल्या, तर मार्शने ४८ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली. मार्कराम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर निकोलस पूरन क्रीजवर आला. तो येताच, पूरनने बॅटने कहर करायला सुरुवात केली. केकेआरचा गोलंदाजी हल्ला पूरनसमोर विनोदासारखा वाटत होता. पूरनने फक्त २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पूरनने ३६ चेंडूंच्या खेळीत कहर केला. लखनौच्या या फलंदाजाने नाबाद ८७ धावा करताना ७ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार मारले.
Worked his magic again 🎩
Shardul Thakur got the HUGE wicket of Andre Russell 👏
David Miller with an impressive catch 👌
Was this the turning point of the match?
Scorecard ▶ https://t.co/3bQPKnxnJs#TATAIPL | #KKRvLSG | @imShard pic.twitter.com/GlWY35nRel
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आकाशदीपने संघासाठी २ विकेट घेतले तर शार्दूल ठाकूरने देखिल संघासाठी २ विकेट्स नावावर केले. आवेश खान, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.