
IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral
लखनौ विरुद्ध पंजाब सामना ईकाना स्टेडियममधील खेळपट्टी क्रमांक ५ वर खेळला जाईल. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. यपीएल २०२६ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी, पाठलाग करणाऱ्या संघाने तीन सामने जिंकले तर २प्रथण फंलदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. आयपीएल २०२६ मध्ये इतर मैदानाच्या तुलनेत ईकाना स्टेडियवर सर्वात कमी धावसंख्या पाहायला मिळाली. येथे स्फोटक फलंदाजीपेक्षा गोलंदाजी अधिक फायदेशीर ठरते. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो. येथे तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही अंदाज नाही.
या स्टेडियमवर एकूण २८ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १२ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले तर १५ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या २३५ आहे, जी २०२४ मध्ये केकेआरने केली होती. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७४ आहे. या मैदानावर आतापर्यंत १७७ धावसंख्या पाठलाग करणाऱ्या संघाने गाठली आहे.
आयपीएलमध्ये,लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी तीन सामने लखनौने जिंकले तर पंजाबने चार सामने जिंकले आहेत. पण आजचा सामना पंजाबसाठी अत्यंत महत्वाचा सामना असणार आहे.
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग
लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव
SRH जिंकली पण RCB सरस! पराभवातही बंगळुरूचा ‘टॉप गेम’; पाहा कसं बदललं समीकरण