Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB Final Match : अंतिम सामन्यात आरसीबीच्या स्वप्नावर पावसाची टांगती तलवार! पंजाबसाठी फायद्याच्या सरी; वाचा सविस्तर..  

३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. या दिवशी जर पावसाचा व्यत्यय आला तर विजतेपदाची माळ पंजाबच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 08:54 PM
PBKS vs RCB Final Match: Rain threatens RCB's dream in the final match! Showers beneficial for Punjab; Read in detail..

PBKS vs RCB Final Match: Rain threatens RCB's dream in the final match! Showers beneficial for Punjab; Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाला नवीन विजेता मिळणार आहे. ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. यावेळी अंतिम सामना इतर सर्वांपेक्षा वेगळा असणार आहे.  चालू हंगामात कोणताही संघ जिंकेल, आरसीबी किंवा पंजाब किंग्ज, प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकणार आहे. त्यानुसार, चाहत्यांना एक नवीन चॅम्पियन बघायला मिळणार आहे. यावेळी बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

आयपीएल सुरू झाली तेव्हापासून हे दोन्ही संघ आयपीएल खेळत आहेत. परंतु आतापर्यंत त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावेळी या दोघांपैकी एका संघाचे स्वप्न पूर्ण होणार आणि आयपीएलला नवीन विजेता देखील मिळेल.  परंतु अंतिम सामन्यापूर्वी, अहमदाबादचे हवामान दोघांच्याही  चिंतेत भर टाकणारे आहे. ३ जून रोजी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : IPL च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि आरसीबी करणार दोन हात; विजेतेपदाचा दावेदार कोण? जाणून घ्या..

अंतिम सामन्यात हवामानाचा अंदाज काय?

३ जून रोजी अहमदाबादमध्ये जेतेपदाच्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस अंतिम सामन्याचा खेळ खराब करण्याची शक्यता आहे. तथापि, बीसीसीआयकडून पावसाला तोंड देण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यत आली आहे.  जर पावसामुळे सामना उशिरा सुरू करण्यात आला तर यासाठी अतिरिक्त १२० मिनिटे वेळेची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.

राखीव दिवसाची तरतूद

बीसीसीआयकडून आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची देखील तरतूद करण्यात आली  आहे.  याचा अर्थ असा की जर ३ जून रोजी अहमदाबादमध्ये पाऊस पडला तर त्याचा अंतिम सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राखीव दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवला आहे.

सामना रद्द झाल्यास कुणाचा फायदा?

बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी ४ जून रोजी राखीव दिवसाची तरतूद केली आहे. परंतु जर या दिवशी पाऊस पडला आणि सामना सुरू झाला नाही तर त्याचा फायदा पंजाब किंग्जला मिळणार आहे. जर ४ जून रोजी पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला विजेता घोषित  करण्यात येणार आहे.  यामागील कारण म्हणजे पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा : MI vs PBKS : Suryakumar Yadav ची गाडी काही थांबेना! IPL मध्ये रचला इतिहास, Sachin Tendulkar ला टाकले पिछाडीवर; वाचा सविस्तर..

पंजाब किंग्ज आणि आरसीबी दोघांचेही समान १९-१९ गुण झाले आहेत. पण पंजाब किंग्जचा रनरेट बंगळुरूपेक्षा अधिक चांगला आहे. त्यामुळेच सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्ज जिंकणार आहे. सध्या पंजाब किंग्जचा रनरेट ०.३७२ आहे. त्याच वेळी, बंगळुरूचा रनरेट ०.३०१ आहे. पण हे तेव्हा होईल जेव्हा ३ आणि ४ जून रोजी अहमदाबादमध्ये पावसामुळे सामना पाच षटकांपर्यंत देखील खेळवला जाणार नाही.

Web Title: Pbks vs rcb if rain falls in the final match it will be a loss for rcb but a gain for punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 08:54 PM

Topics:  

  • PBKS vs RCB
  • virat kohali

संबंधित बातम्या

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी
1

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
2

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
3

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
4

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.