श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा महामुकाबला उद्या ३ जून रोजी खेळवण्यात येणारा आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आरसीबीने चालू हंगामात शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जनेही आपल्या दमदार खेळाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे. परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांना आरसीबीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, क्वालिफायर २ मध्ये पंजाबने मुंबईचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : विजेतेपदासाठी पंजाबचा ‘हा’ गोलंदाज Virat Kohli साठी अडचणीचा, ठरतो दरवेळी डोकेदुखी..
या सामन्यात अय्यर आणि कंपनीने हार्दिक पंड्याच्या टीमला ज्या पद्धतीने पराभूत केले आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या ताफ्यात खळबळ उडाली असणार आहे. आता आपण आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील आयपीएल इतिहासातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल माहिती घेऊया.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामन्यात बाजी मारली आहे तर त्याच वेळी, पंजाब किंग्जने देखील तेवढेच १८ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत, आता आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात दोघांमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात एकूण तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान, पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बेंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. त्याच वेळी, त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने अय्यरच्या संघावर दबदबा राखत त्यांचा पराभव केला आहे. एका सामन्यात बंगळुरूने ७ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात एकूण ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.
हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : आयपीएल फायनलपूर्वी Virat Kohli ला मोठा झटका! बेंगळुरूमध्ये करण्यात आली कारवाई…
आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या दरम्यान आरसीबीने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला होता. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले होते. त्यानंतर पंजाब किंग्जचा संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर बंगळुरूने छोटेखानी लक्ष्य १० षटकांत पूर्ण करून विजय मिळवला होता. या विजयासह आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.