सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये एकामागून एक विक्रम काबिज करत आहे. अशातच त्याने एक मोठी कामगिरी केली आहे. तो मुंबईसाठी ७०० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर, तो आयपीएलच्या इतिहासात मधल्या फळीत फलंदाजी करताना ७०० धावा करणारा पहिला खेळाडू देखील बनला आहे. तसेच तो १६ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२५ क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ७०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी सूर्याला २७ धावांची गरज होती. त्याने एमआयकडून खेळत असताना काइल जेमिसनने टाकलेल्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून हा भीम पराक्रम करून दाखवला आहे.
हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : आयपीएल फायनलपूर्वी Virat Kohli ला मोठा झटका! बेंगळुरूमध्ये करण्यात आली कारवाई…
सूर्याच्या नावे ‘हा’ पराक्रम
सूर्यकुमार यादव हा आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात ७०० धावा करणारा पहिला नॉन-ओपनर फलंदाज बनला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या नॉन-ओपनर फलंदाजांच्या यादीत सूर्या नंतर एबी डिव्हिलियर्स आणि ऋषभ पंत यांचा नंबर येतो. एबीडीने आयपीएल २०१६ मध्ये आरसीबी संघासाठी एकूण ६८७ धावा केल्या होत्या, तर पंतने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी ६८४ धावा काढल्या होत्या.
सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तो मुंबईसाठी ७०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी २०१० मध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या.
क्वालिफायर-२ सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४४ धावांची खेळी केली होती. या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. मुंबईने पहिल्या डावात २०३ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्जने १९ षटकांत ही लक्ष्य पूर्ण करून अंतिम फेरीत प्रवेश केला.