Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB ची मोठी कारवाई; स्टार खेळाडूवर घातली २ वर्षांची बंदी

PCB banned Cricketer Hamza Nazar for Visa Protocol Breach: पीसीबीने पाकिस्तानी क्रिकेट हमजा नजरवर दोन वर्षाची बंदी घातली आहे. तसेच, १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 02:13 PM
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB ची मोठी कारवाई; स्टार खेळाडूवर घातली २ वर्षांची बंदी
Follow Us
Follow Us:
  • PCB ची मोठी कारवाई
  • हमजा नझरवर दोन वर्षांची बंदी
  • वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळले
पाकिस्तान क्रिकेट संघातून अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) क्रिकेटपटू हमजा नझरवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. २७ वर्षीय नझरला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली आहे. व्हिसा अर्जात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याबद्दल पाकिस्तानी फिरकी अष्टपैलू खेळाडू हमजा नझरवर कारवाई करत, पीसीबीने त्याच्यावर २ वर्षांची बंदी घातली असून मोठा दंडही ठोठावला आहे.

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

पाकिस्तानी क्रिकेटवर पीसीबीने घातली २ वर्षाची बंदी

पीसीबीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. नझरला त्याची बाजू मांडण्याची आणि आरोपांचे खंडन करण्याची पूर्ण संधी देण्यात आली. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर, समितीने प्रकरणाच्या सर्व बाजूंचा विचार केला आणि आपला अहवाल मंडळाला सादर केला. त्यानंतर पीसीबीने नझरवर सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्याचा आणि १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला.

आपल्या अधिकृत निवेदनात, पीसीबीने म्हटले आहे की, ‘खोटी माहिती देणे, तथ्ये उघड न करणे आणि दिशाभूल करणारी माहिती सादर करणे यासंबंधीची प्रकरणे पीसीबी अत्यंत गांभीर्याने घेते. पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित व्यक्तींकडून अपेक्षित व्यक्तीकडून असे वर्तन अपेक्षित नाही आहे. मंडळाने पुढे असेही म्हटले आहे की, ते कोणालाही मंडळाची, पाकिस्तान क्रिकेटची किंवा या खेळावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांची प्रतिष्ठा खराब करू देणार नाही.’

व्हिसावरून झालेल्या वादामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळले

गेल्या काही वर्षांपासून हमजा नझर पाकिस्तानी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असून, तो राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, त्याच्या व्हिसा अर्जासंदर्भातील वादामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. नझरने २०१४ मध्ये बहावलपूर स्टॅग्सविरुद्धच्या क्वाइद-ए-आझम ट्रॉफी सिल्व्हर लीग सामन्यात सियालकोट स्टॅलिअन्सकडून व्यावसायिक पदार्पण केले . त्याने आतापर्यंत १६ प्रथम-श्रेणी, १५ लिस्ट ए आणि १० टी२० सामने खेळले आहेत. नझरने ४१ देशांतर्गत सामन्यांमध्ये १००५ धावा आणि ४७ विकेट्स घेतले आहेत. या बंदीमुळे, त्याला आता पुढील दोन वर्षे पाकिस्तानच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागेल.

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

Web Title: Pcb banned 2 years cricketer hamza nazar for visa protocol breach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Banned
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan Cricket team
  • PCB Cricket

संबंधित बातम्या

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा
1

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.