हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल
नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी केली. निशन मदुष्का व रविंदू रसंथा या जोडीने संघाला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी २०.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या. निशनने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. तो धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या सत्रात भारताने फक्त एक विकेट घेतली. रविंदूने अर्धशतकी खेळीही केली. रवींद्र जडेजाने पसिंदू सुरियाबंदाराला ३५ धावांवर बाद करून भारताला दुसरे विकेट मिळवून दिले. रविंदू ७१ धावा करून तिसऱ्या विकेटवर बाद झाला. पवन रत्नायकेने ३९ आणि अहान विक्रमसिंघेने ३१ धावा केल्या. दोघेही २५० धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार सोनल दिनुशा खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने विकेटकीपर अंजला भंडारासोबत ३४ धावा आणि रमेश मेंडिससोबत ६४ धावा जोडल्या. त्यानंर, नव्या चेंडूचा वापर करुन फिरकीपटू रवींद्र जडेजाने मेंडिसला बाद करून ही भागीदारी तोडली. त्याने ४९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.
2⃣nd success with the ball for Kuldeep Yadav ✅ Anjala Bandara is out LBW! Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 #TeamIndia pic.twitter.com/5F72EulyJX — BCCI (@BCCI) August 7, 2026
मानव सुथारने कर्णधार सोनल दिनुशाची विकेट घेतली. त्याने ७१ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा केशरा नुवान्था नऊ धावांवर, तर दिलुम सुदिरा एका धावेवर होता. भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या संघाचा वेग काहीसा मंदावला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले, तर गुरनूर ब्रारने एक विकेट घेतला. भारताने ७ गोलंदाजांचा वापर केला आणि त्यापैकी ५ गोलंदाजांनी ४ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. दरम्यान, मोहम्मद सिराज , प्रसिद्ध कृष्णा आणि सारांश जैन यांना एकही विकेट मिळाला नाही.
भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सरांश जैन, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकीब नबी
Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?






