
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला निगडीत प्रारंभ
महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, प्रशासन अधिकारी (क्रीडा) दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत
क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस यांनी प्रास्ताविक केले. सुनीता पालवे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र महाजन, सचिन ववले, निखिल सरीन, रोहिणी कदम, वर्षा थोरात यांच्यासह क्रीडा विभागातील सहकारी उपस्थित होते.शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणेआवश्यक आहे. विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
१९ वर्षांखालील मुलांच्या सामन्यांचे निकाल
स्पर्धेच्या १९ वर्षांखालील मुलांच्या गटातील सामन्यांत सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजने कमलनयन बजाज हायस्कूलचा १४-८ असा पराभव केला. इंदिरा स्कूलने जय हिंद हायस्कूलवर २०-० अशी मात केली. अक्षरा इंटरनॅशनल स्कूलने साधू वासवानी स्कूलचा १८-६ असा पराभव केला.कमलनयन बजाज हायस्कूलने ज्युनिअर कॉलेजवर १४-८ अशी बाजी मारली. सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेजने इंदिरा नॅशनल स्कूलचा १३-५ असा पराभव केला. नोव्हेल ज्युनिअर कॉलेजने क्रीम सन अँड शॉप ग्लोबल स्कूलवर ८-४ अशी मात केली.
Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
विविध गटांत चुरशीच्या लढती
सेंट उर्सुला हायस्कूलने नोव्हेल ज्युनिअर कॉलेजचा २६-० असा एकतर्फी पराभव केला. एल प्रो स्कूल, चिंचवडने सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजवर २७-१० असा विजय मिळविला.पुणे जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडू मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आगामी सामन्यांमध्येही विविध गटांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असून, स्पर्धेचा उत्साह आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.