रोहित शर्माने शतक झळकावल्यानंतर रिकी पाॅटिंगला टाकले मागे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, त्याने भारतीय संघाच्या विजयात ४३ शतके झळकावली आहेत. स्टार फलंदाज कोहलीने ३०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ५१ शतके झळकावली आहेत. त्याने कसोटी आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याने ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके ठोकली, त्यापैकी ३३ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला. २०२३ मध्ये कोहलीने सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
रोहित शर्मा यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सिडनी येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक (१२५ चेंडूत नाबाद १२१) झळकावून रिकी पॉन्टिंगला धक्का दिला. सिडनी येथे भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला. रोहितने आतापर्यंत भारताच्या विजयात २६ शतके झळकावली आहेत. त्याने २७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ३३ शतके झळकावली आहेत. रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधूनही निवृत्ती घेतली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यादीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय विजयांमध्ये २५ शतके ठोकली आहेत. पॉन्टिंगने त्याच्या कारकिर्दीत ३७५ एकदिवसीय सामने खेळले आणि ३० शतके ठोकली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला पाचव्या स्थानावर आहे. त्याने १८१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७ शतके झळकावली, त्यापैकी २४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला. श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यानेही संघाच्या विजयात २४ शतके झळकावली. त्याने ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २८ शतके झळकावली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया