पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचे अभिनंदन (फोटो - सोशल मिडिया)
एशियन गेम्स 2026 मध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंतिम सामन्यातील 147 धावांचा विजय हा भारतीय संघाच्या वर्चस्वाची साक्ष देणारा ठरला. महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयाचे कौतुक केले जात आहे.
Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal
या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना 69 रन्सवर ऑल आउट केले. एशियन गेम्ससारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शानदार विजयाचे कौतुक करण्यात आले आहे.
A splendid triumph for Indian cricket! Heartiest congratulations to our Women’s Cricket Team on winning the Gold medal at the Asian Games. It was a commanding performance at the Games, marked by confidence, skill and wonderful teamwork. This victory also brings India its first… pic.twitter.com/oZI9Uoyp6I — PMO India (@PMOIndia) September 22, 2026
पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटसाठी ही शानदार कामगिरी आहे. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेले हे सुवर्णपदक केवळ एका सामन्याचा विजय नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला क्रिकेटची वाढती ताकद अधोरेखित करणारे यश ठरले आहे.
IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास






