मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
मुंबई : देशात लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. INDIA आघाडीकडून काल (रविवार, 1 नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात आलं. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पार पडलं. तसंच, भाजपकडूनही काँग्रेसविरोधात आंदोलन पार पडलं. यावरून आता राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘देशाला मोदीजी हवे आहेत. आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत,’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. इंदिरा गांधी यांनीही संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
ही लढाई केवळ भाजप किंवा मोदी सरकारची नसून देशाच्या संविधानासाठी असल्याचं सांगत विचार काहीही असू द्या, लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं.
काँग्रेसच्या आंदोलनांमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. देशातील राजकीय व्यवस्था आणि संविधानिक संस्था बदलण्याच्या प्रयत्नांना त्यांनी ‘रेजिम चेंज’ असं संबोधलं.
बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचा दाखला देत भारतात असं काहीही घडू देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने अनेकदा संविधानासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत फडणवीस यांनी १९७५-७७ च्या आणीबाणीचा उल्लेख केला. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात मूलभूत अधिकारांवर निर्बंध आणण्यात आले होते, असं ते म्हणाले. काँग्रेसचा आजचा चेहरा बदलला असला तरी विचार तेच आहेत, असा टोला लगावत त्यांनी ‘बॉटल नई है, शराब वहीं है’ असं विधान केलं.
राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या पुस्तकावरूनही फडणवीस यांनी टीका केली. संविधानाचं पुस्तक दाखवलं जातं, मात्र त्यामागील विचारांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं ते म्हणाले. संविधानिक संस्थांवर मोर्चे काढण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.
दरम्यान, फडणवीसांच्या या आक्रमक विधानांमुळे भाजप आणि काँग्रेसमधील संविधानावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Ans: राहुल गांधी यांना देशात अतिडावी व्यवस्था निर्माण करायची असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली.
Ans: निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सत्ता आणि देशातील संस्थात्मक व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांना त्यांनी रेजिम चेंज असं संबोधलं.
Ans: राहुल गांधी लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक दाखवत असल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यावर टीका केली. त्या पुस्तकाच्या माध्यमातून विरोधक कोणता संदेश देत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.






