पंतप्रधान मोदी (फोटो- सोशल मिडिया)
जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करून मायदेशी परतलेल्या भारतीय खेळाडूंचे आज मायदेशात जंगी स्वागत केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील प्रतिष्ठित इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांशी विशेष संवाद साधणार आहेत.
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नवे रेकॉर्डस रचले आहेत. या स्पर्धेत भारताने तब्बल 114 पदके जिंकली आहेत. यामध्ये 30 गोल्ड, 41 रौप्य आणि 43 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन देखील करणार आहेत.
भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी या संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन केले आहे. चीनमधील हांगझू येथे २०२३ मध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने 27 गोल्ड मेडलसह 108 पदके जिंकली होती. यावेळच्या कामगिरीने हांगझूचा तो ऐतिहासिक विक्रम देखील मागे टाकला गेला आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० हून अधिक पदकांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड केला आहे.
जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केवळ पदकांची लयलूट केली नाही, तर आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अनेक नवे विक्रमही स्थापन केले आहेत. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू सुमित अंतिल, धावपटू सिमरन शर्मा आणि जेहान यांनी आपल्या श्रेणीत उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.
भारताची स्टार स्प्रिंटर सिमरन शर्मा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि प्रमुख खेळाडू ठरली आहे. तिने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर T12 स्पर्धांमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे जेहान यानेही आपल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत गोल्ड मेडल जिंकले आहे.
Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत
Ans: एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने 114 पदके जिंकली आहेत.
Ans: एशियन पॅरा गेम्स 2026 मधील खेळाडूंची आज पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत.






